शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

चार्टर्ड अकाऊंटंट्सने सामान्य लोकांना शिक्षित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 20:40 IST

चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) व्यवसाय हा उत्कृष्ट व्यवसाय आहे. देशात मूल्य आधारित आर्थिक व्यवस्था सीए पुढे नेऊ शकतो. जगात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास ६ ते ७ टक्के दराने होत आहे. त्यात सीएंची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची होत आहे. अशावेळी सीएंनी सामान्य लोकांनाही शिक्षित करावे, असे मत लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केले.

ठळक मुद्देविजय दर्डा : सीए विद्यार्थ्यांची परिषद सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपर : चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) व्यवसाय हा उत्कृष्ट व्यवसाय आहे. देशात मूल्य आधारित आर्थिक व्यवस्था सीए पुढे नेऊ शकतो. जगात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास ६ ते ७ टक्के दराने होत आहे. त्यात सीएंची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची होत आहे. अशावेळी सीएंनी सामान्य लोकांनाही शिक्षित करावे, असे मत लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केले.उत्तर अंबाझरी मार्गावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात सीए विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दर्डा बोलत होते. मंचावर विशेष अतिथी म्हणून द चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाचे (आयसीएआय) माजी अध्यक्ष जयदीप शाह, परिषदेचे संचालक व आयसीएआयच्या सेंट्रल कौन्सिलचे सदस्य निहाल जंबुसरिया, आयसीएआयच्या पश्चिम विभागाचे सदस्य अभिजित केळकर, नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष उमंग अग्रवाल, उपाध्यक्ष सुरेन दुरगकर, सचिव किरीट कल्याणी, कोषाध्यक्ष साकेत बागडिया, पश्चिम भारताच्या सीए विद्यार्थी असोसिएशनचे (विकास) अध्यक्ष जितेंद्र सागलानी, उपाध्यक्षा ख्याती गट्टानी आणि सचिव अपेक्षा गुंडेचा उपस्थित होते.दर्डा यांनी स्पष्ट केले की, अशोक चांडक यांच्या कारकीर्दीत एका सर्वेक्षणात असे म्हटले होते की, भारतात १० हजार लोकांमागे एका सीएची आवश्यकता असेल. या मानकानुसार आम्हाला १० ते १२ लाख सीएंची गरज आहे. पण आमच्याकडे आज जवळपास २ लाख ७५ हजार सीए आहेत. नागपुरातील ७०० विद्यार्थ्यांनी सीए कोर्स निवडल्याचा आनंद आहे, असे दर्डा म्हणाले.दर्डा यांनी महिला सीएच्या भूमिकेची प्रशंसा केली. महिला आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणतात, हे जागतिक स्तरावर सिद्ध झाले आहे. २५ टक्के सीए विद्यार्थी महिला असल्याचे ऐकून आनंद होतो. आयसीएआयच्या शिस्तपालन समितीची कठोर आचारसंहिता आहे, असे सांगताना दर्डा म्हणाले, बहुतेक सीए वाईट नाहीत तर काही वाईट सीए व्यवसायात अनैतिकता आणू शकतात. बऱ्याचदा सीएंनी जारी केलेली प्रमाणपत्रे चुकीची आहेत आणि अशा अनैतिक पद्धतीचे अनुसरण सीएंनी करू नये, अशी विनंती त्यांनी केली.पॉन्झी अथवा पैसा दुप्पट करण्याच्या योजनांवर दर्डा म्हणाले, लोकमतने पॉन्झी योजना चालविणाºया प्रमोद अग्रवाल, समीर जोशी आणि प्रशांत वासनकर यांच्यासारख्यांचा पर्दाफाश केला आहे आणि ते सर्व तुरुंगात आहेत. सीएंनी ३० ते ४० टक्के परतावा देणाºया योजनांची जनजागृती करावी आणि पर्दाफाश करावा, असे दर्डा म्हणाले.जयदीप शाह म्हणाले, विद्यार्थ्यांनी सीए अभ्यासक्रमात सातत्य ठेवावे, कठोर परिश्रम घ्यावे, आत्मविश्वास निर्माण करावा आणि आव्हानात्मक परिस्थितीत यशस्वी सीए बनविण्यासाठी मनाचा समतोल साधावा.निहार जांबुसरिया म्हणाले, आयसीएआयने व्हर्च्युअल क्लासेस आणि ई-लर्निंग पद्धत दाखल केली असून ही पद्धत विद्यार्थ्यांना वेगाने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाशी सांगत घालून उत्तम सीए बनविण्यास सक्षम करते.अभिजीत केळकर म्हणाले, पाठ्यपुस्तक आणि वर्गखोल्या या ज्ञान आणि कौशल्याचा भाग आहे. पण केवळ व्यावहारिक अनुभव त्यांना परिपूर्ण बनवितात.विकासाचे अध्यक्ष जितेंद्र सागलानी म्हणाले, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळावण्यासाठी आयसीएआयचे अभ्यास मंडळ अभ्यासक्रमात विविध बदल करीत आहे.प्रास्तविक भाषणात उमंग अग्रवाल म्हणाले, सीएंनी व्यवसायात विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची गरज आहे. सीए विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यासाठी नागपूर शाखेला मिळालेला हा सन्मान आहे.यावेळी विजय दर्डा यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सीए संस्थेचे माजी अध्यक्ष संदीप जोतवानी यांनी दर्डा यांना आणि माजी अध्यक्ष सीए स्वप्निल घाटे यांनी सीए जयदीप शाह यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. संचालन आर. ऐश्वर्या आणि सुदर्शन दिवाणजी यांनी केले. सीए किरीट कल्याणी यांनी आभार मानले.चार्टर्ड अकाऊंटंटच्या नावामागे सीए उपसर्ग लावण्यासाठी दर्डा यांनी सूचविलेसुमारे दोन दशकापूर्वी विजय दर्डा यांनी चार्टर्ड अकाऊंटंटच्या नावाआधी सीए उपसर्ग लावण्यासाठी आयसीएआयला एक प्रणाली सादर करण्यास सुचविले होते, असा खुलासा जयदीप शाह यांनी आपल्या भाषणात केला. डॉक्टर हे नावापुढे डॉक्टर आणि इंजिनिअर हे नावापुढे इंजिनिअर लावतात तर चार्टर्ड अकाऊंटंटने नावापुढे सीए संलग्न केले पाहिजे, असा यामागे तर्क होता. आयसीएआायने ही सूचना स्वीकारली आणि तेव्हापासून चार्टर्ड अकाऊंटंट आपल्या नावापुढे सीए पसर्ग जोडत आहेत, असे शाह म्हणाले.यावेळी नागपूर सीए संस्था आणि आरसीएमचे माजी सदस्य अध्यक्ष सीए जुल्फेश शाह, आरसीएमचे माजी सदस्य सीए जेठालाल रुखियाना, नागपूर सीए संस्थेचे माजी अध्यक्षा कीर्ती लोया, नागपूर शाखेच्या विकासाचे कोषाध्यक्ष योगेश अडवाणी, सहसचिव उदित चोईथानी, सहसंपादक त्रिशिका शाहू व रिषिका नारंग आणि सीए विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :chartered accountantसीएVijay Dardaविजय दर्डा