शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

चार्टर्ड अकाऊंटंट आयकर विभागाचे ‘आधारस्तंभ’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 19:19 IST

चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाने (आयसीएआय) केलेली प्रगती महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीने देशातील कर यंत्रणेची कार्यप्रणाली सुलभ करण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंटच्या प्रयत्नांना मान्यता दिली असून ते आयकर विभागाचे आधारस्तंभ असल्याची भावना प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशा अग्रवाल यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे मुख्य आयकर आयुक्त आशा अग्रवाल यांचा सीए संस्थेशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाने (आयसीएआय) केलेली प्रगती महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीने देशातील कर यंत्रणेची कार्यप्रणाली सुलभ करण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंटच्या प्रयत्नांना मान्यता दिली असून ते आयकर विभागाचे आधारस्तंभ असल्याची भावना प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशा अग्रवाल यांनी व्यक्त केली.‘आयसीएआय’च्या नागपूर शाखेच्या वतीने नवनिर्वाचित नागपूर विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशा अग्रवाल यांचा आयकर भवनात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष उमंग अग्रवाल, आयसीएआयच्या अकाऊंटिंग फॉर लोकल बॉडीचे सदस्य सीए जुल्फेश शाह, सीए सुरेन दुरगकर, सीए किरीट कल्याणी, सीए साकेत बागडिया, सीए संदीप जोतवानी, सीए संजय अग्रवाल आणि सीए विजय अग्रवाल उपस्थित होते.सीएंशी संवाद साधताना अग्रवाल म्हणाल्या, विदर्भात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात असून विकासाच्या प्रचंड संधी आहेत. देशाचे मुख्य लॉजिस्टिक हब म्हणून पुढे येत आहे. विदर्भात करदाते कसे वाढतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. देश हा त्यातील क्षेत्रामुळे मजबूत किंवा कमकुवत नसतो. मुख्यत्वे अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. नागपुरात गेल्या दोन दशकांपासून बदल दिसून येत आहे. पण विकासाचे प्रतिबिंब महसूल संग्रहणात दिसून येत नाही. थेट करांसह अर्थव्यवस्थेचा विकास हा वाढत्या अर्थव्यवस्थेचे एक निरोगी चिन्ह आहे. तंत्रज्ञानाने सरकारी कार्यालयातील व्यवहाराचा मागोवा घेणे शक्य केले आहे. करदात्यांना भविष्यात आयकरासंदर्भात अडचणी टाळण्यासाठी सीएंनी विविध त्रुटी आणि अडचणींसंदर्भात करदात्यांना शिक्षित करावे, असे आवाहन आशा अग्रवाल यांनी केले.प्रारंभी सीए उमंग अग्रवाल यांनी आशा अग्रवाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि संपूर्ण सीएंच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. उमंग अग्रवाल म्हणाले, काही दृष्टीने व्यावसायिकांना विभागाकडून मदतीची गरज आहे. ट्रस्टच्या समस्या सोडविण्याठी नागपुरात पूर्णवेळ आयकर आयुक्ताची गरज आहे. या भागातील जास्तीत जास्त ट्रस्ट आयकराच्या टप्प्यात आल्या आहेत. भविष्यात प्रधान मुख्य आयकर आयुक्तांचा सीएंसोबत नियमित संवाद असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.शाह यांनी आयकर विभागासोबत अनुभव सांगितले. आयसीएआय आणि आयकर विभाग हे एक कुटुंब असून एकमेकांचे सहकार्य आणि आदर अपेक्षित आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आशा अग्रवाल यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

टॅग्स :chartered accountantसीएIncome Taxइन्कम टॅक्स