लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी कामठी शहरालगतच्या कन्हान नदी परिसरात कारवाई करीत चाेरून नेत असलेली बैलजाेडी जप्त केली. त्या बैलजाेडीची किंमत ७० हजार रुपये असल्याचे पाेलिसांनी सांगितले. ही कारवाई बुधवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अज्ञात चाेरट्यांनी वारेगाव (ता. कामठी) शिवारातील शेतातून बैलजाेडी चाेरली आणि ती घेऊन कामठी शहराच्या दिशेने निघाले. त्याचवेळी कामठी (जुनी) पाेलिसांचे पथक या भागात गस्तीवर हाेते. चाेरट्यांनी पाेलिसांना पाहताच बैलजाेडी साेडून पळ काढला. संशय आल्याने पाेलिसांनी बैलजाेडी ताब्यात घेत जप्त केली. ती बैलजाेडी सेवानिवृत्त उपविभागीय पाेलीस अधिकारी अजिज खान यांच्या मालकीची असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे ती बैलजाेडी अजिज खान यांच्या शेतातील नाेकर देवराव आनंदराव उकुंडे (५७, रा. खापरखेडा, ता. सावनेर) यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली.
अजिज खान यांची वारेगाव शिवारात शेती असून, त्यांची सर्व जनावरे शेतातील गाेठ्यातच असतात. यातील बैलजाेडी चाेरट्यांनी साेडून चाेरून नेण्याचा प्रयत्न केला. या बैलजाेडीची किंमत ७० हजार रुपये असल्याचे पाेलिसांनी सांगितले. या प्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक फाैजदार युनूस शेख यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.