शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर काळा बाजाराच्या आठ प्रकरणांत आरोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 20:43 IST

remedisivir black market नागपूर पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शन काळा बाजाराच्या आठ प्रकरणांमधील आरोपींविरुध्द प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात वेगवेगळी आरोपपत्रे दाखल केली आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शन काळा बाजाराच्या आठ प्रकरणांमधील आरोपींविरुध्द प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात वेगवेगळी आरोपपत्रे दाखल केली आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.

पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले. उच्च न्यायालयाने गेल्या तारखेला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. तसेच, या प्रकरणांचा तपास व खटले शेवटाला पोहोचविण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, पोलीस आयुक्तांनी ३० एप्रिल रोजी बैठक आयोजित करून त्या तारखेपर्यंत विविध पोलीस ठाण्यात दाखल सर्व १२ प्रकरणांवर सखोल चर्चा केली. बैठकीमध्ये सर्व अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी सर्व प्रकरणांचा सखोल तपास करण्यास सांगितले. तसेच, संबंधित पोलीस उपायुक्तांनी तपासाचे सुक्ष्म निरीक्षण करावे आणि आरोपपत्रांची विधी अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून त्रुटी दूर कराव्यात, असे निर्देश जारी केले. त्यानंतर १ मे रोजी तहसील पोलीस ठाण्यात एक नवीन गुन्हा नोंदविण्यात आला. संबंधित आरोपपत्रे ३ मे रोजी न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. इतर प्रकरणांचा तपास प्राथमिकस्तरावर असून, त्यात आरोपपत्र दाखल करण्यास आणखी काही दिवस लागतील, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी उच्च न्यायालयाला दिली.

सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब

यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए़ हक व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने पोलीस आयुक्तांचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन अन्य मुद्दे विचारात घेण्यासाठी प्रकरणावर येत्या गुरुवारी पुढील सुनावणी निश्चित केली. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून, सरकारच्या वतीने अ‍ॅड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधं