शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

एलेक्स डान्स ग्रुपसह आयोजकांवर गुन्हा दाखल; ‘न्यूड डान्स’ क्लिपची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 20:38 IST

Nagpur News दुपारी ‘सर्जा-राजा’ची शर्यत आणि रात्र होताच बंद शामियानात ‘न्यूड डान्स’ असा प्रकार उमरेड आणि कुही तालुक्यात काही दिवसांपासून सुरू आहे. या ‘न्यूड डान्स’ची क्लीप व्हायरल होताच पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत.

ठळक मुद्दे पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

नागपूर : दुपारपासून ते सांयकाळपर्यंत ‘सर्जा-राजा’ची शर्यत आणि रात्र होताच बंद शामियानात ‘न्यूड डान्स’. बीभत्सपणाचा कळस गाठणारा हा प्रकार नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि कुही तालुक्यात काही दिवसांपासून सुरू आहे. या ‘न्यूड डान्स’ची क्लीप व्हायरल होताच पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक आणि एलेक्स डान्स ग्रुपच्या ‘त्या’ तरुण-तरुणींवर उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी चंद्रशेखर ऊर्फ लाला प्रभूजी मांढरे, सूरज नीळकंठ नागपुरे, अनिल शालीकराम दमके (सर्व, रा. बाम्हणी ता. उमरेड) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघेही या आयोजनात प्रमुख असल्याचे समजते.

शनिवारच्या अंकात ‘लोकमत’ने ‘दिवसा शंकरपट; रात्री शामियानात न्यूड डान्स’ या मथळ्यातील वृत्त प्रकाशित करीत शंकरपटाच्या नावावर सुरू असलेला हा बीभत्सपणा उजेडात आणला होता. यानंतर पोलिसांनी बाह्मणी शिवारातील घटनास्थळ गाठत संपूर्ण चौकशी केली. दरवर्षी १७ जानेवारीला बाह्मणी येथे शंकरपटाचे आयोजन होत असते. कुही, उमरेड तालुक्यांतील ज्या परिसरात शंकरपटाचे आयोजन होते, त्या परिसरात ठिकठिकाणी ‘डान्स शो’ची पत्रके लावण्यात आली होती. या पत्रकात एक मोबाईल क्रमांक आणि या डान्स हंगाम बुकिंगसाठी नागपूर येथील दिघोरी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यातूनच या कार्यक्रमाच्या आयोजकांनी संपर्क साधला असावा आणि ‘एलेक्स डान्स’शो झाल्याची बाब पोलिसांनी व्यक्त केली. याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात २९४, ११४,१८८,३४ भा.द.वि. सहकलम १३१(अ), ११०, ११२, ११७ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओबाबत चौकशी सुरू असून, या प्रकरणाचा छडा लावू आणि योग्य कारवाई करू.यशवंत सोलसे, पोलीस निरीक्षक, उमरेड

पोलीस नागपूरला रवानाडान्स हंगामाचे सादरीकरण करणारे नागपूर येथील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पत्रकात ‘एलेक्स जुली के हंगामे’ अशी बाब ठळकपणे नमूद आहे. ही एलेक्स जुली कोण, अशी चर्चासुद्धा परिसरात रंगलेली आहे. सादरीकरण करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी उमरेड पोलीस नागपूरला रवाना झाले आहेत.

ही आपली संस्कृती नाही. असला प्रकार माझ्या क्षेत्रात झाला असेल तर नक्कीच दोषींवर कारवाई झाली पाहिजे. भविष्यात अशाप्रकारचे आयोजन होणार नाही, अशी लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका राहणार आहे.

- राजू पारवे, आमदार, उमरेड विधानसभा क्षेत्र

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी