शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वीज क्षेत्रातील ‘नियम व विनियमनात’ होणार बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 21:46 IST

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी नव्याने बनविण्यात येणाऱ्या नियम व विनियमामध्ये महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्याची दखल घेत महावितरणने केलेल्या सूचनांचे आयोगाने स्वागत केले.

ठळक मुद्देवीज नियामक आयोगाने घेतली कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाश्वत व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा करण्यासाठी सध्याच्या वीज यंत्रणा व त्याच्या व्यवस्थापनामध्ये होणारे बदल पाहता विजेचे ‘नियम व विनियमनात’ही अनुषंगिक बदल करणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय व राज्य वीज नियामक आयोगाकडून संयुक्तरीत्या महाराष्ट्रातील सर्व वीज कंपन्यांसोबत शुक्रवारी महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी नव्याने बनविण्यात येणाऱ्या नियम व विनियमामध्ये महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्याची दखल घेत महावितरणने केलेल्या सूचनांचे आयोगाने स्वागत केले.देशाच्या प्रगतीमध्ये वीज क्षेत्राचे स्थान महत्त्वाचे असून, गेल्या काही वर्षात या क्षेत्रात सरासरी ६ टक्के इतकी वाढ झाली आहे. या क्षेत्रात झालेल्या तंत्रज्ञानातील शोध कार्यामुळे पारंपरिक वीज निर्मितीबरोबरच अपारंपरिक वीज निर्मितीमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे.देशात महाराष्ट्र राज्य हे वीज क्षेत्रात अग्रणी असून, मागील काही वर्षांत महावितरणने यामध्ये सकारात्क बदल करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने होणाºया ‘रियल टाईम मार्केट’ (आरटीएम) आणि ’सेक्युरिटी कंन्स्ट्रेंड इकोनॉमीक डिस्पॅच’ (एससीईडी) या दोन विनियमांबाबत केंद्रीय वीज नियामक आयोग व महाराष्ट्र राज्य् विद्युत नियामक आयोगाने महाराष्ट्रातील वीज कंपन्यांची संयुक्त कार्यशाळा आयोजित केली होती. दोन्ही विनियमनाबाबत त्यांनी वीज कंपन्यांच्या सूचना जाणून घेतल्या.या कार्यशाळेला केंद्रीय वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष पी.के. पुजारी व मुख्य नियामक सुशांत चॅटर्जी, राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, सदस्य मुकेश खुल्लर व आय.एम. बोहरी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानोटिया, पॉवर सिस्टीम कॉपोर्रेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक केव्हीएस. बाबा, महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण व संचालक (वित्त) जयकुमार श्रीनिवासन यांचेसह महानिर्मिती, बेस्ट, टाटा पॉवर, अदानी आदी वीज कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण