शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

समाजाला समोर आणण्यासाठी बदल आवश्यक

By admin | Updated: June 23, 2014 01:21 IST

जैन समाजाला विविध क्षेत्रात समोर आणण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहे. यासाठी चालीरीतींना आधुनिक आणि समृद्ध बनविले पाहिजे. कुटुंबातील मुलांसोबत व्यवसाय किंवा व्यवहार करताना

भारतीय जैन संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांचे मतनागपूर : जैन समाजाला विविध क्षेत्रात समोर आणण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहे. यासाठी चालीरीतींना आधुनिक आणि समृद्ध बनविले पाहिजे. कुटुंबातील मुलांसोबत व्यवसाय किंवा व्यवहार करताना वैज्ञानिक आणि व्यावहारिक गोष्टी स्वीकारून पुढे गेले पाहिजे. ज्या प्रकारे काळ बदलत आहे त्या प्रमाणेच आपले कार्य केले पाहिजे, तेव्हाच एका चांगल्या समाजाची रचना केली जाऊ शकते, असे मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी मांडले. सामाजिक-शैक्षणिक आणि सेवाक्षेत्रात कार्यरत भारतीय जैन संघटनेद्वारे शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यासाठी राष्ट्रव्यापी अभियान चालविण्यात आले. यात्रेदरम्यान विविध पाडाव पार करीत प्रफुल्ल पारख नागपुरात पोहचले. त्यांनी रविवारी रात्री वर्धमाननगरात जैन समाजाच्या सभेला संबोधित केले. पारख म्हणाले, समाजातील वाढत्या आधुनिकीकरणासोबतच तरुण आणि मुलांसोबतच व्यवहारात पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. आईवडिलांनी मुलांसोबत मैत्रीचे नाते निर्माण केले पाहिजे. उदाहरणार्थ मुलांनी मोबाईलवरील गोष्टी सांगितल्या पाहिजे. तरुणी सुरक्षित राहाव्यात यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी समाजाच्या निवडक सदस्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. ज्या प्रकारे काळ बदलत आहे त्या मानाने येणाऱ्या पिढ्या आमच्या वर्तमानातील व्यवसाय स्वीकारणार नाहीत. त्यामुळे व्यापार आणि व्यवसायाचे आधुनिकीकरण होणे गरजेचे आहे. भारतीय जैन संघटनेने युवकांना आधुनिक व्यापार आणि व्यवसायाचे ज्ञान होण्यासाठी प्रशिक्षण योजना तयार केली आहे. यासाठी देशभरातील ५० युवकांची निवड करण्यात येणार आहे. त्यांचा देशातील ६० शहरांमध्ये दौरा केला जाणार आहे. देशातील आयआयएमच्या व्यापार व्यवसाय विभागाच्या प्रमुख प्राध्यापकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध शहरातील आघाडीच्या व्यावसायिकांसोबत त्यांच्या मुलाखती होतील. हे प्रशिक्षित युवक परत आल्यावर समाजातील लोकांना प्रशिक्षित करतील. त्यामुळे समाजातील व्यवसायिक साचा आधुनिक होईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राज्याचे अध्यक्ष पारस ओसवाल उपस्थित होते. (प्रतिनिधी)