शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

काळानुरूप आव्हाने लक्षात घेता संघ शिक्षा वर्गाच्या अभ्यासक्रमात बदल

By योगेश पांडे | Updated: May 17, 2024 17:22 IST

पराग अभ्यंकर : नवीन नाव व नवीन अभ्यासक्रमासह संघाच्या राष्ट्रीय पातळीवरील वर्गाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे देशभरात लोकसभा निवडणूकांचे वातावरण असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी मात्र राष्ट्रीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय मध्ये व्यस्त झाले आहेत. डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील महर्षि व्यास सभागृहात शुक्रवारी या वर्गाची सुरुवात झाली. तृतीय वर्ष वर्गाऐवजी कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय हे नवीन नाव व यंदापासून लागू करण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रम ही यंदाच्या वर्गाची विशेषता आहे.

उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी, मुकुंद सी.आर., रामदत्त चक्रधर, अ. भा. सेवा प्रमुख तसेच वर्गाचे पालक अधिकारी पराग अभ्यंकर तसेच वर्ग सर्वाधिकारी इकबाल सिंह प्रामुख्याने उपस्थित होते. संघ प्रणालीत प्रशिक्षण वर्गाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे जसजसे काम वाढत गेले तसतसे विविध प्रांतांमध्ये प्रशिक्षण वर्ग घेण्यास सुरुवात झाली. बंदीचा काळ आणि कोरोनाचा काळ वगळता संघाचे प्रशिक्षण वर्ग कधीही खंडीत झाले नाहीत. काळानुरूप प्रशिक्षण वर्गाचा कालावधी आणि अभ्यासक्रम यात बदल करण्यात आला. कार्यकर्त्याची विचारसरणी काय असावी, त्याच्यासमोरील आव्हाने काय आहेत, हे लक्षात घेऊन व्यवस्थेतही बदल करण्यात आले. पूर्वीच्या वर्गांमध्ये, शारीरिक कार्यक्रमांतर्गत संयम आणि धैर्य वाढविण्यावर भर दिला जायचा. आता आव्हाने बदलली आहेत. त्याचे संदर्भ समजून घेत या आव्हानांना उत्तर द्यायचे असल्याने तशा विषयांचाही या वर्गात समावेश करण्यात आला आहे. या वर्गात शिक्षार्थींना समाजातील सज्जन शक्तीशी जोडून आपली शक्ती कशी वाढवायची याचे व्यावहारिक प्रशिक्षण मिळणार आहे, असे पराग अभ्यंकर यांनी सांगितले. यंदाच्या वर्गात देशभरातून ९३६ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. १० जून रोजी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या वर्गाचा समारोप होणार आहे.

यावेळी वर्ग कार्यवाह अशोक अग्रवाल, मुख्य शिक्षक निलेश भंडारी, सह मुख्य शिक्षक कुणाल जी., बौद्धिक प्रमुख उदय शेवडे, सह बौद्धिक प्रमुख कृष्ण प्रसाद व अणम, सेवा प्रमुख धनीराम, व्यवस्था प्रमुख सुनिल भुलगावकर व सहव्यवस्था प्रमुख नितीन एदलाबादकर हेदेखील उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर