शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

बिल्डरच्या फायद्यासाठी विकास आराखड्यात बदल!

By admin | Updated: November 10, 2015 03:32 IST

उपराजधानीच्या विकास आराखड्यातील वांजरा-नारी ते कोराडीपर्यंतचा मार्ग हटवून नशेमन सोसायटीच्या सात कुटुंबांचा निवारा हिरावला आहे.

नासुप्रच्या अधिकाऱ्यांवर आरोप; २००१ सालचा आराखडा ठरविला नियमबाह्ययोगेंद्र शंभरकर नागपूरउपराजधानीच्या विकास आराखड्यातील वांजरा-नारी ते कोराडीपर्यंतचा मार्ग हटवून नशेमन सोसायटीच्या सात कुटुंबांचा निवारा हिरावला आहे. चुकीच्या पद्धतीने घरे पाडण्यात आल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. न्यायासाठी नागपूर सुधार प्रन्याससह नगरविकास विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु या कुटुंबांना अद्याप न्याय मिळालेला नाही. नासुप्रचे काही अधिकारी याला दुजोरा देत आहेत. परंतु समोर येण्यास तयार नाही. गरीब लोकांनी कष्टाच्या पैशात बचत करून घराचे बांधकाम केले. या जागेची त्यांच्याकडे रजिस्ट्री आहे. २००३ मध्ये येथील नागरिकांनी नासुप्रकडे नियमितीकरणासाठी एक हजार रुपये जमा केले. प्लॉट नियमित होणार अशी आशा असताना अचानक विकास आराखड्यात बदल करण्यात आला. त्यानंतर मे २०१४ रोजी मौजा वांजरा येथील खसरा क्रमांक २५/२ मधील प्लॉट क्रमांक ९९,१००,१०१,१०७,१०८,१०९,१११,११२,११३,११४,११८,१२०,१२१, १२२,१३६,१३७,१३५,१४९,१५० व १९९ च्या मालकांना नासुप्रच्या विभागीय कार्यालयाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्यांदा ११ जुलै २०१४ रोजी उत्तर विभागाच्या कार्यालयाने पत्र पाठवून मार्ग बाधित केल्याचा आक्षेप घेत प्लॉटधारकांना कागदपत्रासह कार्यालयात हजर होण्यास सांगितले. त्यांना नासुप्रच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार हस्तांतरित जमिनीच्या मोबदल्यात १०० टक्के टीडीआर अथवा डीसीआरअंतर्गत नुकसान भरपाई देण्याबाबतचे पत्र पाठविण्यात आले. दरम्यान १२१ प्लॉटधारक सुरेश प्रसाद यांनी माहिती अधिकारात नासुप्रकडे डीपी प्लॅन व महापालिकेच्या मंजूर नकाशाची प्रत हस्तगत केली. या नकाशाच्या आधारे ज्या भूखंडधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या ते सर्व प्लॉट विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता भूखंड क्रमांक १०२,१०३,१०४,१२६,१२७,१२८,१२९,१३०,१३१ व १३३ या प्लॉटमधून व हाऊ सिंग कॉलनीला लागून जात असल्याचे दर्शविण्यात आले आहे. डीपी आराखड्यात बदल करण्यात आल्याने ले-आऊ ट अनधिकृत झाले. नकाशा मंजूर न करताच बांधकाम करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर गेल्या अनेक वर्षांपूर्वी नियमितीकरणासाठी रक्कम भरली. त्यानंतर नासुप्रने नियमितीकरणाची प्रक्रि या पूर्ण का केली नाही, असा आरोप शेख सलाम यांनी केला आहे. १९ जुलैला नासुप्रचे पथक प्रचंड पोलीस बंदोबस्तात आले व त्यांनी घराचे बांधकाम पाडले. पूर्वीच्या आराखड्यातील डीपी रोड काही बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी बदलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चिन्हांकित करण्याची जबाबदारी विभागाचीबाधित होणाऱ्या भूखंडधारक भेटीसाठी आले होते. त्यांना विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले होते. चिन्हांकनाचे काम विभागीय कार्यालयामार्फ त केले जाते. परंतु येथील प्लॉटधारकांना याची कोणतीही कल्पना देण्यात आलेली नव्हती. नासुप्रच्या अधिकृत ले-आऊ टमधील प्लॉटधारकांनाच गुंठेवारी कायद्यांतर्गत टीडीआर दिला जातो. नागरिकांनी प्लॉट खरेदी करण्यापूर्वी त्यांनी याची शहानिशा करावी.- एस. पी. अलोणी, सहायक संचालक, नगररचना विभाग