शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 00:58 IST

केंद्रीय प्रवेश समितीने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम १ जुलैपासून जाहीर केला. १५ जुलैपासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्जाचा (भाग-१) भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यावर्षी प्रवेशाच्या नियमात थोडा बदल केला आहे. ‘पहिले या, पहिले मिळवा’ योजनेत बदल केला आहे.

ठळक मुद्दे१५ पासून सुरू होईल ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम १ जुलैपासून जाहीर केला. १५ जुलैपासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्जाचा (भाग-१) भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यावर्षी प्रवेशाच्या नियमात थोडा बदल केला आहे. ‘पहिले या, पहिले मिळवा’ योजनेत बदल केला आहे.१५ जुलैपर्यंत शाळा, महाविद्यालयांना नोंदणी करायची आहे. नोंदणी करणाऱ्या ज्युनिअर कॉलेजला प्रवेश प्रक्रियेत सहभागी करण्यात येणार आहे. यावर्षी समिती विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नियम व कार्यप्रणालीची माहिती देणारी सूचना पुस्तिका यंदा देणार नाही. आयडी व पासवर्ड यासाठी विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन किटसुद्धा मिळणार नाही. विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया ऑनलाईन करायची आहे. समितीच्या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना आयडी व पासवर्ड ऑनलाईन देण्यात येईल. विद्यार्थ्यांना फीसुद्धा ऑनलाईन भरायची आहे. (भाग-१) फॉर्म भरल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचा अर्धा टप्पा पूर्ण होईल, नंतरचा टप्पा दहावीचा निकाल लागल्यानंतरचा आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज (भाग-२) भरणे सुरू होणार आहे.तीन टप्प्यात संपणार प्रक्रियासूत्रांच्या सांगण्यानुसार यावेळी प्रवेश प्रक्रिया तीन राऊंडमध्ये संपणार आहे. या तीनही राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. कोरोनामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया एक महिना उशिरा सुरू झाली आहे. जर प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू ठेवल्यास विद्यार्थ्यांचे १८० दिवसांचे सत्र पूर्ण होणार नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियात काही बदल केले आहे. गेल्या वर्षी पाच ते सहा राऊंड झाल्यानंतर जागा रिक्त राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला होता.विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी केंद्र देणे सुरूकेंद्रीय प्रवेश समितीद्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत यंदा काही बदल केले आहेत. शिवाय यंदा माहिती पुस्तिकासुद्धा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळा, महाविद्यालयस्तरावर केंद्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शाळा, महाविद्यालयाला मार्गदर्शन केंद्र हवे आहे, त्यांनी शिक्षण उपसंचालक अथवा केंद्र प्रवेश समितीच्या अध्यक्षाच्या नावाने अर्ज करायचा आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय