शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील बदलामुळे राजकारणाचे वारे बदलतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:12 IST

श्रम करण्यास आम्ही मागे नाही. मेहनत करू, दिलेली जबाबदारी पूर्णपणे पेलून पक्षाला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. राज्यात ताठर मानेने पक्ष कसा उभा राहील, यासाठी प्रयत्न करू, असे मत काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष नितीन राऊत यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देआमची लढाई ‘आरएसएस’सोबत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा होती. राहुल गांधी यांच्या मान्यतेने बाळासाहेब थोरात यांची अध्यक्षपदी तर माझ्यासह पाच कार्यकारी अध्यक्षांची निवड करण्यात आली. कोणताही बदल हा देश, संघटन आणि खेळ यासाठी काहीतरी देऊन जातो. या बदलामुळे राज्यातील राजकारणाचे वारे बदलतील. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीसाठी चांगली संधी आहे. श्रम करण्यास आम्ही मागे नाही. मेहनत करू, दिलेली जबाबदारी पूर्णपणे पेलून पक्षाला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. राज्यात ताठर मानेने पक्ष कसा उभा राहील, यासाठी प्रयत्न करू, असे मत काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष नितीन राऊत यांनी येथे व्यक्त केला.काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशिवाय पाच कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री नितीन राऊत यांचाही समावेश आहे. राज्याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी रविवारी सर्वप्रथम दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना नितीन राऊत म्हणाले, पाच कार्यकारी अध्यक्षांमुळे कुठलाही वाद होणार नाही. उलट काँग्रेसला मजबूत करण्यासाठी सर्व मिळून काम करतील. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे आमची लढाई आरएसएससोबत आहे. त्यादिशेने आम्ही सर्व एकजुटीने लढा देऊ. काँग्रेसच्या अंतर्गत वादाबाबत विचारले असता काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.आम्ही आमचे वाद विसरून एकत्रपणे लढा देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अनिल नगरारे, जुल्फीकार अली भुट्टो, संजय दुबे, साहेबराव सिरसाट आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत