शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांनी कधी गावातला विकास पाहिला नाही, त्यांना विदर्भाच्या समस्या..; बावनकुळेंचा विरोधकांना खोचक टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2022 12:19 IST

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर साधला निशाणा

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ११ डिसेंबररोजी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरात प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त सुरू असलेल्या तयारीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पाहणी व आढावा घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कार्यक्रमानिमित्त आज (दि. १०) नागपुरात पत्रपरिषद घेत माहिती दिली.

समृद्धी महामार्ग होऊ नये म्हणून एका वर्गाचे प्रयत्न सुरू होते. अनेकांनी आडकाठी टाकली, विघ्न आणण्यांच काम केलं पण देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे या महामार्गाचं काम यशस्वीपणे पार पडलं. ज्यांनी कधी गावातला विकास पाहिला नाही, विकास हा शब्दच ऐकला नाही, त्यांना विदर्भाच्या समस्या काय कळणार? सोन्याच्या चमच्याने बादामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेल्यांना काय माहिती विदर्भ, मराठवाड्याचा विकास.. असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला. ही राजकीय पत्रपरिषद नाही त्यामुळे यावर आपण आत्ता जास्त बोलणार नाही, आम्ही योग्य वेळी बोलू असे बावनकुळे म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्ग, वंदे भारत रेल्वे तसेच नागपूर मेट्रो फेस-२ च्या लोकार्पण सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेमध्ये उत्साह आहे. सर्व नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उत्साहाने पंतप्रधानांचे स्वागत करावे व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. यासह इतर जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ, मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

सीमा भागात तणाव निर्माण करून मार्ग निघणार नाही

कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलायचं ते बोलू देत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून त्यावरील निकालानंतरच काय ते स्पष्ट होईल. मात्र, जाळपोळ, आणि तणावाचे वातावरण निर्माण करून मार्ग निघणार नाही. त्यामुळे कोणीही भडकावू वक्तव्य करून प्रकरण आणखी चिघळवण्याचं टाळावं, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेNarendra Modiनरेंद्र मोदीnagpurनागपूरPoliticsराजकारण