शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर वीज केंद्राने १० वर्षांचे वीज शुल्क हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:46 IST

चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्र मागील १० वर्षांपासून राज्य सरकारला ‘इलेक्ट्रिसिटी ड्युटी’ अदा करीत नाही. दहा वर्षांनंतर जेव्हा विद्युत निरीक्षकाने महावितरणच्या मुख्य अभियंत्यास नोटीस जारी करीत याचे कारण विचारले तेव्हा ही बाब उघडकीस आली.

ठळक मुद्दे२०१० पासून सुरू आहे घोटाळा : नोटीसद्वारे खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्र मागील १० वर्षांपासून राज्य सरकारला ‘इलेक्ट्रिसिटी ड्युटी’ अदा करीत नाही. दहा वर्षांनंतर जेव्हा विद्युत निरीक्षकाने महावितरणच्या मुख्य अभियंत्यास नोटीस जारी करीत याचे कारण विचारले तेव्हा ही बाब उघडकीस आली.चंद्रपूर येथे महाजेनकोचे २९२० मेगावॅट क्षमतेचे औष्णिक वीज केंद्र आहे. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी केंद्राजवळच ऊर्जानगर येथे रहिवासी कॉलनी तयार करण्यात आली आहे. ही कॉलनी नेहमीच रोषणाईने उजळलेली असते. विद्युत निरीक्षकाने जारी केलेल्या नोटीसमधून ही बाब उघडकीस आली आहे की, एप्रिल २०१० ते आतापर्यंत या केंद्राने इलेक्ट्रिसिटी ड्युटीसह वीज बिल भरलेले नाही. ‘इलेक्ट्रिसिटी ड्युटी’हे ते शुल्क आहे जे थेट राज्य सरकारच्या खात्यात जमा होते. विद्युत निरीक्षकाने याच शुल्कासाठी अनेकदा पत्रे लिहिली, परंतु कुठलाही पुढाकार घेण्यात आलेला नाही. इतकेच नव्हे तर यासंदर्भात माहितीसुद्धा देण्यात आली नाही. या नोटीसद्वारे निष्काळजीपणाबद्दल २४ टक्के व्याज का वसूल करण्यात येऊ नये, अशी विचारणाही केली नाही. दुसरीकडे महावितरणच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, महाजेनकोची वीज कंपनी खरेदी करते. त्याचे बिल कागदांवर अ‍ॅडजेस्ट होतात. रहिवासी कॉलनीत केंद्रातून उत्पादित विजेचा थेट पुरवठा केला जातो. हे प्रकरण २०१० पासून सुरू झाले. दुसरीकडे महावितरणचे म्हणणे आहे की, महाजेनकोने एच.टी. कनेक्शनची मागणी केली आहे. यावर त्यांना सेक्युरिटी डिपॉझिटची डिमांड नोट देण्यात आली. परंतु केंद्राने डिपॉझिट भरले नाही. त्यामुळे कनेक्शन देता आले नाही. परिणामी वीज बिल जारी झाले नाही. यामुळे राज्य सरकारला मागील दहा वर्षांपासून इलेक्ट्रिसिटी ड्युटीचे नुकसान होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य नागरिकाने जर एक महिन्याचे वीज बिल भरले नाही तरमहावितरणचे कर्मचारी वीज कनेक्शन कापण्यासाठी पोहोचतात. आता वीज केंद्रच इलेक्ट्रिसिटी ड्युटी हडपीत आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई होईल, याकडे लक्ष लागले आहे.मार्ग काढण्याचा प्रयत्नदोन्ही कंपन्यांमध्ये बुक अ‍ॅडजेस्टमेंट असते. विद्युत निरीक्षकाच्या नोटीसबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू असून, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातोय.सुनील देशपांडेमहावितरणचे मुख्य अभियंता

टॅग्स :electricityवीज