शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या एमबीए विद्यार्थिनीवर नागपुरात बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:47 IST

चंद्रपूरच्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवीत हिंगणघाट (जि. वर्धा) येथील एका व्यावसायिकाने तिच्याशी शरीरसंबंध जोडले. तिचा गर्भपात करून आता तिला लग्नास नकार देणाऱ्या अमित राजेंद्र चाफले (रा. प्राध्यापक कॉलनी, हिंगणघाट) तसेच त्याच्या परिवारातील दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देहिंगणघाटच्या व्यावसायिकाविरुद्ध तक्रारअजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमत

नागपूर : चंद्रपूरच्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवीत हिंगणघाट (जि. वर्धा) येथील एका व्यावसायिकाने तिच्याशी शरीरसंबंध जोडले. तिचा गर्भपात करून आता तिला लग्नास नकार देणाऱ्या अमित राजेंद्र चाफले (रा. प्राध्यापक कॉलनी, हिंगणघाट) तसेच त्याच्या परिवारातील दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.फिर्यादी तरुणी (वय २४) चंद्रपूर येथील एमबीएची विद्यार्थिनी आहे. आरोपी अमित चाफले हा हिंगणघाट शहरातील मोठा व्यावसायिक आहे. त्याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. या दोघांनी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. १७ एप्रिल २०१७ ला तिला अमितने अजनीतील ओंकारनगरात बोलवून घेतले. तेथे त्याने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध जोडले. तेव्हापासून २४ जून २०१७ पर्यंत त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित झाल्याने ती गर्भवती झाली. त्यामुळे आरोपी अमित, त्याचे वडील राजेंद्र चाफले तसेच पूजा चाफले यांनी तिला अशा गर्भवती अवस्थेत लग्न करणे योग्य होणार नाही, असे समजाविले. त्यानंतर तिला काही गोळ्या खायला दिल्या. त्या खाल्ल्यामुळे तरुणीचा गर्भपात झाला. त्यानंतर मात्र आरोपी तिला टाळू लागला. तिने लग्नासाठी तगादा लावला असता आरोपी अमितने तिला तिच्यासोबतचे एकांतातील फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली. तो लग्नास नकार देत असल्याचे पाहून तरुणीने चंद्रपूरच्या रामनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तेथे गुन्हा दाखल केला. मात्र, प्रकरण अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे ती केस डायरी अजनी पोलिसांना पाठविली. अजनी पोलिसांनी आरोपी अमित, राजेंद्र आणि पूजा चाफले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर