शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

प्रदूषणाच्या विळख्यात चंद्रपूर

By admin | Updated: January 16, 2015 01:01 IST

चंद्रपूर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असतानाही तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी तडाली एमआयडीसीमध्ये नियम डावलून ३६ नवीन कोळसा वखारींना मंजुरी दिली आहे. यामुळे चंद्रपूरच्या

हायकोर्टात याचिका : ३६ वखारींना नियम डावलून मंजुरीनागपूर : चंद्रपूर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असतानाही तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी तडाली एमआयडीसीमध्ये नियम डावलून ३६ नवीन कोळसा वखारींना मंजुरी दिली आहे. यामुळे चंद्रपूरच्या धोकादायक सीमेपर्यंत पोहोचलेल्या प्रदूषणात आणखी भर पडेल, असा दावा समाजसेवक राजीव कक्कड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत केला आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांनी १४ जानेवारी रोजी याचिकेवर सुनावणी केली. न्यायालयाने केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी, उद्योगमंत्री/महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी, क्षेत्रीय व्यवस्थापक आणि ३६ कोळसा वखार कंपन्यांना नोटीस बजावली आहे. याचिकाकर्त्याने कोळसा वखार कंपन्यांना स्वत: नोटीस तामील केली असून यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ३६ पैकी एका कोळसा वखार कंपनीने वकिलामार्फत न्यायालयात उपस्थिती दर्शवून उत्तर सादर करण्यासाठी २८ जानेवारीपर्यंत वेळ घेतला आहे. याचिकेतील माहितीनुसार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २००९ मध्ये काढलेल्या सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांकात चंद्रपूर चौथ्या क्रमांकावर आहे. नासाने केलेल्या उपग्रह सर्वेक्षणात चंद्रपूर शहरात १५६० मायक्रोन्स ‘आरएसपीएम’स्तर आढळला आहे. नियमानुसार हा स्तर १५० मायक्रोन्स असायला पाहिजे. ७० पेक्षा जास्त ‘सीईपीआय’ असलेला परिसर गंभीर प्रदूषित मानला जातो. चंद्रपूर शहरात ८३.८८ ‘सीईपीआय’ आहे. देशातील प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूर दुसऱ्या स्थानावर आहे. यामुळे केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने १३ जानेवारी २०१० रोजीच्या अध्यादेशाद्वारे चंद्रपूर, तडाली, घुग्गुस व बल्लारशाह औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग उभारण्यावर बंदी आणली आहे. यानंतर शासनाने १५ मार्च २०१० रोजी दुसरा अध्यादेश काढून गंभीर प्रदूषित औद्योगिक क्षेत्राच्या सीमा संबंधितांना कळविल्या. तडाली एमआयडीसीचा यात समावेश आहे. ३० मार्च २०१० रोजी काढण्यात आलेल्या तिसऱ्या अध्यादेशानुसार २५ औद्योगिक क्षेत्रावर बंधने आणण्यात आली. हा अध्यादेश तडाली एमआयडीसीला लागू आहे. असे असतानाही ३६ कोळसा वखारींना मंजुरी देण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अवधूत पुरोहित यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)