शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

केंद्राची ऑफर न स्वीकारण्याइतके पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 14:46 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्तेची दिलेली ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार(Sharad Pawar) कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्देपवार आणि त्यांचे शिष्य काहीही झालं की त्याचा दोष केंद्र सरकारला देतात'नाचता येईना आंगण वाकडे' : चंद्रकांत पाटलांचा शरद पवार यांना टोला

नागपूरराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचे 'नाचता येईना आंगण वाकडे' म्हणत पवार हे केंद्राकडून सत्ता स्थापन करण्यासाठी आलेली ऑफर न स्वीकारण्याइतके कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आज नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांनी आपल्याला केंद्रातील भाजपकडून सत्तेसाठी ऑफर आली होती मात्र आपण ती स्वीकारली नाही त्यामुळे तपास यंत्रणेकडणं राष्ट्रवादी काँग्रेसला त्रास दिला जातोय, असे म्हटले होते. यावर प्रत्रकाराने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, केंद्राकडून आलेल्या ऑफरला नाही, म्हणण्याइतके पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत. केंद्राबरोबर असलेल्या सरकारबरोबरच महाराष्ट्रातील सरकर स्थापन करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं असतं, असेही पाटील म्हणाले.

राज्यातील कोळसा टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले, पवार हे सगळ्यांचे गुरू असल्यामुळे पवार आणि त्यांचे शिष्य काहीही झालं की त्याचा दोष केंद्र सरकारला देऊन मोकळे होतात. केंद्राने कोळसा दिला नाही असे ते म्हणतील मात्र, पावसामुळे कोळसा कमी मिळेल, त्यामुळे तो वेळेत स्टॉक करा असे केंद्राने आधीच सांगितले होते. मात्र, ते याबाबत बोलणार नाहीत, असेही पाटील म्हणाले. केंद्राच्या इशाऱ्यानंतरही कोळशाचा साठा करण्यात कमी  पडलो हेही ते सांगणार नाहीत, अशी टीकाही पाटील यांनी केली.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलnagpurनागपूर