लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अप्पर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी अखेर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून शुक्रवारी पदभार स्वीकारला.राज्य सरकारने अलीकडेच तीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात चंद्रभान पराते यांचाही समावेश होता. त्यांची माफसूच्या कुलसचिवपदी बदली करण्यात आली होती. परंतु रुजू होतेवेळी त्यांच्या बदलीचे आदेश स्थगित झाल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात असे कुठलेही लेखी आदेश निघालेलेच नव्हते. दुसरीकडे कुलसचिव परंतु शुक्रवारी नाट्यमयरीत्या त्यांना पदभार सोपवण्यात आला. शुक्रवारी माफसूचा दीक्षांत समारंभ होता. हा समारंभ पार पडताच पराते यांनी हेमंतकुमार पवार यांच्याकडून पदभार स्वीकारला. पवार यांची बदली एनएमआरडीएमध्ये झाली आहे.
चंद्रभान पराते माफसूचे कुलसचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:23 IST
अप्पर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी अखेर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून शुक्रवारी पदभार स्वीकारला.
चंद्रभान पराते माफसूचे कुलसचिव
ठळक मुद्देनाट्यमयरीत्या पदभार सोपवला