शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

रंग बदलणारा शामेलियन सरडा नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 20:04 IST

Chameleon lizard ‘गिरगीट की तरह रंग बदलते हाे तुम,’ असे एखाद्याला आपण म्हणताे. असा हा रंग बदलण्यात माहीर असलेला गिरगीट अर्थात शामेलियन नावाचा दुर्मीळ सरडा नागपुरात पाहायला मिळाला. गाेधनी परिसरातून रेस्क्यू करून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला.

ठळक मुद्देगाेधनी परिसरात आढळला : डायनासाेरप्रमाणे रूप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘गिरगीट की तरह रंग बदलते हाे तुम,’ असे एखाद्याला आपण म्हणताे. असा हा रंग बदलण्यात माहीर असलेला गिरगीट अर्थात शामेलियन नावाचा दुर्मीळ सरडा नागपुरात पाहायला मिळाला. गाेधनी परिसरातून रेस्क्यू करून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला.

सरडा प्रजातीत माेडणारा शामेलियन हा ओबडधाेबड दिसणारा प्राणी ज्युरासिक पार्कच्या डायनासाेरशी साधर्म्य साधणारा आहे. बुधवारी नागरिकांना ताे गाेधनी भागातील रस्त्यावर दिसून आला. सामान्यत: सरडा पाहिल्यावर कुणाला आश्चर्य वाटणार नाही; पण शामेलियनच्या रूपामुळे ताे भीतीदायकही वाटताे. त्यामुळे नागरिकांनी सर्पमित्र शुभम पराळे यांना माहिती दिली. शुभमने घटनास्थळी जाऊन या सरड्याला रेस्क्यू केले. गुरुवारी त्याला वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

शामेलियनची वैशिष्ट्ये

शामेलियन हा अतिशय शांत व बिनविषारी जीव आहे. भारतभर सरड्याच्या प्रजाती आढळतात. शेतात, परसबागेत, रस्त्यावर, झाडांवर ताे सहज दिसताे; पण शामेलियन त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. शामेलियन मुख्यत्वे आफ्रिका, दक्षिण युराेप, दक्षिण आशिया व श्रीलंकेत आढळताे; मात्र ताे भारतात आढळणाऱ्या इतर प्रजातीपेक्षा वेगळा आहे. त्याच्या दिसण्यापासून ते असण्यापर्यंत. खडबडीत शरीर, चपट्या केल्यासारख्या बगला, एकावर एक तीन शारस्त्राण घातल्यासारखं डाेकं, कडबाेळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शाेभणारे लुकडे पाय असे त्याचे रूप. ताे सहसा झाडावरच राहताे. तहान लागल्यावर पानावर पडलेले दवबिंदू पिताे; मात्र सरड्याची मादी जमीन उकरून त्यात अंडी घालते. शामेलियनची जीभ म्हणजे त्याचे शस्त्र. आठ ते नऊ इंच लांब गुलाबीसर जिभ आपल्या चिकट टोकाने भक्षाला खेचून घेते. किडे माकोडे, भुंगे, फ़ुलपाखरं, मोठे मुंगळे हे त्याचे खाद्य. डाेळेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते शंकुप्रमाणे स्वतंत्र वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात. रंग बदलणे ही त्याची माेठी क्षमता. शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्याला मिळालेली ही देगणी. शरिरातल्या रंगपेशी शक्यतो सभाेवतालच्या रंगानुरूप हुबेहूब रंग धारण करण्याची क्षमता त्यांच्यात असते.

टॅग्स :nagpurनागपूर