शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिकेच्या स्ट्रीट एलईडी लॅम्पस् खरेदीला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:23 IST

महापालिकेच्या स्ट्रीट एलईडी लॅम्पस् खरेदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या व्यवहारात १०० कोटीवर रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात जनहित याचिका : १०० कोटी रुपयांवर गैरव्यवहाराचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या स्ट्रीट एलईडी लॅम्पस् खरेदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या व्यवहारात १०० कोटीवर रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.अ‍ॅड. अभियान बाराहाते यांनी एका वर्तमानपत्रातील बातमीच्या आधारावर यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. नगरसेवक संदीप सहारे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मिळविलेल्या माहितीवरून ती बातमी प्रकाशित झाली आहे. याचिकाकर्त्याने ती माहिती तपासून पाहिली असता त्यात तथ्य असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. महापालिकेचे अधिकारी खासगी कंपन्यांसोबत मिळून सार्वजनिक निधीची दिवसाढवळ्या लूट करीत आहेत. बाजारात अवघ्या ३४०० रुपये नगाप्रमाणे उपलब्ध होऊ शकणारे स्ट्रीट एलईडी लॅम्पस् महापालिकेने चक्क ९९०० रुपये दराने खरेदी करण्याचा करार केला आहे. असे १ लाख ३८ हजार स्ट्रीट एलईडी लॅम्पस् खरेदी केले जाणार असल्यामुळे हा तब्बल १०० कोटीवर रुपयांचा उच्चस्तरीय भ्रष्टाचार असल्याचे दिसून येते असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.या खरेदी व्यवहाराचा संपूर्ण रेकॉर्ड न्यायालयात सादर करण्यात यावा, मनपा खरेदी करणार असलेले एलईडी लॅम्पस् व बाजारात उपलब्ध असलेले एलईडी लॅम्पस् यांची गुणवत्ता व किमतीची तज्ज्ञांमार्फत तुलना करून अहवाल मागविण्यात यावा, मनपास एलईडी लॅम्पस् पुरविणाऱ्या कंपनीला बिल अदा करण्यास मनाई करण्यात यावी व या गैरव्यवहारात सामील व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकेत महापालिका आयुक्त, महापौर, खरेदी समिती अध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष, वीज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल व नगरसेवक संदीप सहारे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. शशिभूषण वहाणे बाजू मांडतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर