शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

अनधिकृत ले-आऊट नियमित करण्याच्या तरतुदीला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 23:40 IST

Challenging the provision for regularizing unauthorized layout राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट नियमित करण्यासाठी २००१ मधील महाराष्ट्र गुंठेवारी कायद्यात दुरुस्ती केली आहे़ या नवीन तरतुदीच्या वैधतेला व्यावसायिक अजय तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे़ यासंदर्भात त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे़

ठळक मुद्दे नागपूर शहराला काँक्रिटचे जंगल होण्यापासून वाचवण्याची विनंती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट नियमित करण्यासाठी २००१ मधील महाराष्ट्र गुंठेवारी कायद्यात दुरुस्ती केली आहे़ या नवीन तरतुदीच्या वैधतेला व्यावसायिक अजय तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे़ यासंदर्भात त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे़

गुंठेवारी कायद्यात अनधिकृत ले-आऊटना प्रतिबंध घालण्याचा उल्लेख करण्यात आला आहे़ असे असताना २००१ पासून आतापर्यंत एकट्या नागपुरातील सुमारे ५००० अनधिकृत ले-आऊट नियमित करण्यात आले आहेत़ त्यासाठी मैदाने, उद्याने इत्यादीच्या सुमारे ७००० एकर जमिनीशी तडजोड करण्यात आली आहे़ प्रशासनाने आतापर्यंत अर्धे शहर नियमित केले आहे़ त्यावरून सरकारला अनधिकृत ले-आऊटना प्रतिबंध घालण्यापेक्षा असे ले-आऊट नियमित करण्यामध्ये अधिक रुची असल्याचे सिद्ध होत आहे़ त्यामुळे संपूर्ण शहर काँक्रिटचे जंगल झाले आहे़ समाज व विकासकांना जमीन खरेदी करून अवैध ले-आऊट विकण्याची सवय लागली आहे़ करिता, ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट नियमित करण्याची तरतूद अवैध घोषित करून रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे़ याचिकेत राज्य नगर विकास विभाग, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगरपालिका, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे़ याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. एम़ अनिलकुमार कामकाज पाहणार आहेत़

प्रशासन कर्तव्य बजावण्यात अपयशी

प्रशासन कर्तव्याचे काटेकोर पालन करण्यास अपयशी ठरत आहे़ परिणामी, सर्रास अनधिकृत ले-आऊट पाडले जात आहेत़ त्यावर अनधिकृत बांधकामे केली जात आहेत़ प्रशासन संबंधिताना केवळ नोटीस बजावून गप्प बसते़ ठोस कारवाई करीत नाही़ यावरून न्यायालयाने वेळोवेळी राज्य सरकार व प्रशासनाला फटकारले; पण परिस्थितीत काहीच फरक पडला नाही, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे़

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर