शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विधी अभ्यासक्रमाच्या नवीन परीक्षा पद्धतीला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 19:58 IST

न्यायालयात केवळ विधी पदवीच्या पाच वर्षीय अभ्यासक्रमासाठी लागू पद्धतीला  आव्हान देण्यात आले आहे. नवीन पद्धतीनुसार पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या व सातव्या सत्राची परीक्षा घेण्याचा अधिकार महाविद्यालयांना देण्यात आला आहे. उर्वरित सत्रांची परीक्षा विद्यापीठ घेणार आहे. अंतिम ग्रेड व निकाल विद्यापीठाच्या परीक्षेतील गुणांच्या आधारावर निश्चित केला जाणार आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : अमरावती विद्यापीठाशी संबंधित प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विधी पदवीच्या पाच वर्षीय अभ्यासक्रमासाठी नवीन परीक्षा पद्धती लागू केली आहे. त्याविरुद्ध अ‍ॅड. मंगेश बुटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात २८ सप्टेंबर २०१७ रोजी वटहुकूम जारी करण्यात आला आहे. त्याद्वारे विविध अभ्यासक्रमांसाठी नवीन परीक्षा पद्धती लागू करण्यात आली आहे. न्यायालयात केवळ विधी पदवीच्या पाच वर्षीय अभ्यासक्रमासाठी लागू पद्धतीला  आव्हान देण्यात आले आहे. नवीन पद्धतीनुसार पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या व सातव्या सत्राची परीक्षा घेण्याचा अधिकार महाविद्यालयांना देण्यात आला आहे. उर्वरित सत्रांची परीक्षा विद्यापीठ घेणार आहे. अंतिम ग्रेड व निकाल विद्यापीठाच्या परीक्षेतील गुणांच्या आधारावर निश्चित केला जाणार आहे. ही पद्धत लागू करताना बार कौन्सिल आॅफ इंडियाची परवानगी घेण्यात आली नाही. या पद्धतीला महाविद्यालये व विद्यार्थ्यांनी विरोध केला होता, पण त्यांची दखल घेण्यात आली नाही. तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी अशी पद्धत लागू करण्यात आलेली नाही. परिणामी, नवीन निर्णय रद्द करून पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा विद्यापीठाने घ्याव्यात असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.विद्यापीठ, कौन्सिलला नोटीसन्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी सोमवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व बार कौन्सिल आॅफ इंडिया यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. अ‍ॅड. मंगेश बुटे यांनी स्वत:च बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAmravatiअमरावती