शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महाजनकोमधील १५४ अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरतीला आव्हान; ३१ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 10, 2023 16:45 IST

Nagpur News ऐन परीक्षेच्या वेळी निगेटिव्ह मार्किंगचा नियम जाहीर करण्यात आल्याचा आरोप करीत संकेत वाघायेसह २८ पीडित उमेदवारांनी महाजनकोमधील १५४ अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरतीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

राकेश घानोडेनागपूर : ऐन परीक्षेच्या वेळी निगेटिव्ह मार्किंगचा नियम जाहीर करण्यात आल्याचा आरोप करीत संकेत वाघायेसह २८ पीडित उमेदवारांनी महाजनकोमधील १५४ अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरतीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेऊन महाजनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता (तांत्रिक), कार्यकारी संचालक व परीक्षा घेणारी संस्था दि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांना नोटीस बजावली आहे. तसेच, यावर ३१ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरतीसाठी सप्टेंबर-२०२२ मध्ये जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२२ रोजी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला गेला. त्यामध्ये परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही, असे नमूद करण्यात आले होते. २७ व ३० डिसेंबर २०२२ रोजी लेखी परीक्षा झाली. त्या दिवशी उमेदवारांना निगेटिव्ह मार्किंग राहील, अशी माहिती देण्यात आली. परिणामी, उमेदवार दबावाखाली आले. त्यांना आत्मविश्वासाने पेपर सोडविता आला नाही. करिता, त्यांनी सक्षम अधिकाऱ्यांना तक्रारी करून परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. परंतु, अधिकाऱ्यांनी त्याकडे दूर्लक्ष करून पात्र उमेदवारांना २ व ५ मे २०२३ रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविले. त्यामुळे उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. पुरुषोत्तम पाटील यांनी कामकाज पाहिले.याचिकेवरील निर्णयाधीन राहील भरतीमहाजनकोद्वारे अतिरिक्त कार्यकारी अभियंतापदी केल्या गेलेल्या नियुक्त्या या याचिकेवरील निर्णयाधीन राहतील, असेही उच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. परिणामी, याचिका मंजूर झाल्यास महाजनकोला सर्व नियुक्त्या रद्द कराव्या लागतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय