शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
4
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
5
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
6
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
7
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
8
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
9
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
10
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
11
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
12
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
13
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
14
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
15
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

आव्हान अन् संघर्षही

By admin | Updated: June 17, 2014 00:52 IST

लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस हायकमांडने दिलेला आपला शब्द पाळला आणि प्रा. जोगेंद्र कवाडे याची विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. काँग्रेसपासून दुरावलेल्या आंबेडकरी-दलित

कवाडे यांचा प्रवास अपेक्षा वाढल्या नागपूर : लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस हायकमांडने दिलेला आपला शब्द पाळला आणि प्रा. जोगेंद्र कवाडे याची विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. काँग्रेसपासून दुरावलेल्या आंबेडकरी-दलित समाजाला पुन्हा आपल्यासोबत जोडण्याच्या दृष्टीने या नियुक्तीकडे पाहिले जात आहे. आंबेडकरवादी सामाजिक चळवळीमध्ये प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नावाची गौरवपूर्ण नोंद केली जाते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यासाठी त्यांनी काढलेला लाँगमार्च हा ऐतिहासिक असून मार्टीन ल्युथर किंगच्या लॉंगमार्चशी त्याची आजही तुलना केली जाते. विद्यार्थी अवस्थेपासूनच रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनमध्ये आणि विद्यार्थी आंदोलनात सक्रिय असलेले प्रा. कवाडे हे ‘मास लीडर’ म्हणून ओळखले जातात. नामांतरासह अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय असलेल्या प्रा. कवाडे यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष विविध गटात विभागला गेला असला तरी त्यांची राजकीय ताकद आजही महत्त्वाची मानली जाते. प्रा. कवाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष रिपाइंचा प्रमुख गटापैकी एक मानला जातो. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रा. जोगेंद्र कवाडे आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या मुख्य संयोजिका अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी काँग्रेसला साथ दिली. त्यावेळी काँग्रेस हायकमांडने दोघांनाही काही राजकीय आश्वासन दिले होते. विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करून ते आश्वासन पाळण्यात आले असे मानले जात आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला दलित समाज पक्षापासून दुरावल्यानेच काँग्रेसचा अशा मानहानीकारक पद्धतीने पराभव झाल्याचे मानले जाते. तसेच रिपाइंचे ज्येष्ठ नेते रामदास आठवले यांनी आधीच महायुतीची साथ धरली. तसेच ऐन निवडणुकीत रामविलास पासवान यांच्यासारख्या राष्ट्रीय दलित नेत्यानेसुद्धा भाजपाला जवळ केले. इतकेच नव्हे तर काँग्रेसचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश गजभिये यांना विधान परिषदेवर घेऊन दलित समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला. या सर्व बाबी विचारात घेऊन काँग्रेसने प्रा. कवाडे यांना दिलेला शब्द पाळून दलित समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)खैरलांजीच्या मुद्यावरून राजीनामा प्रा. जोगेंद्र कवाडे हे यापूर्वी चिमूर मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून ते विधान परिषदेवरही निवडून गेले होते. परंतु डिसेंबर २००७ मध्ये त्यांच्या सदस्यत्वाची मुदत संपायला काही महिने शिल्लक असताना त्यांनी खैरलांजी हत्याकांडाच्या निषेधार्ह विधान परिषदेच्या सभासदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि आंदोलनात भाग घेतला होता. कितपत होणार लाभ? प्रा. जोगेंद्र कवाडे हे कधी राष्ट्रवादी, कधी काँग्रेस तर कधी भाजपसोबतही राहिले आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तत्कालीन उमेदवार नितीन गडकरी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. तसेच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशामध्ये भाजपा उमेदवारांसाठी प्रचार सुद्धा केला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांचा मुलगा जयदीपलाही विधानसभेच्या निवडणुकीत उतरविले होते. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा दलितबहुल मतदारसंघ आहे. परंतु त्यावेळी त्यांच्या मुलाला अवघी १४३८ मते मिळाली होती. लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. प्रा. कवाडे यांच्या माध्यमातून काँग्रेस निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. परंतु याचा कितपत लाभ होईल, हे येणारा काळच सांगेल.