शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक पर्यावरण दिवस; उपराजधानीसमोर वायुप्रदूषणाचे आव्हान; ‘एक्यूआय’देखील वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 10:09 IST

उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरात होत असली तरी मागील काही काळापासून शहरात प्रदूषणाची समस्या वाढायला लागली आहे. शहरातील तलाव प्रदूषित झाले आहेतच. शिवाय विविध पट्ट्यांमध्ये वायूप्रदूषणाची आकडेवारीच चिंतेत टाकणारी आहे.

ठळक मुद्दे‘पीएम २.५’च्या प्रमाणात नागपूर राज्यात तिसऱ्या स्थानी

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरात होत असली तरी मागील काही काळापासून शहरात प्रदूषणाची समस्या वाढायला लागली आहे. शहरातील तलाव प्रदूषित झाले आहेतच. शिवाय विविध पट्ट्यांमध्ये वायूप्रदूषणाची आकडेवारीच चिंतेत टाकणारी आहे. ‘पीएम २.५’च्या प्रमाणात नागपूर राज्यात तिसºया स्थानी असून शहरातील वाढणारा ‘एक्यूआय’ (एअर क्वॉलिटी इंडेक्स) विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरतो आहे.मागील वर्षी ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या अहवालातून ‘पीएम २.५’च्या प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले होते. वायूप्रदूषणासंदर्भात ‘पीएम २.५’ हे ‘पीएम १०’पेक्षा जास्त घातक मानण्यात येतात. नागपुरातील ‘पीएम २.५’चे प्रमाण २०१३ साली ३३ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. २०१४ मध्ये हेच प्रमाण ३४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर गेले. तर २०१६ साली शहरात जागोजागी विकासकामांसाठी खोदकाम सुरु असताना हाच आकडा चक्क ८४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर पोहोचला होता. ‘एअर व्हिज्युअल’-‘ग्रीनपीस’ने जारी केलेल्या २०१८ च्या अहवालानुसार निर्धारित पातळीहून नागपुरात ‘पीएम २.५’चे (पर्टिक्युलेट मॅटर) प्रमाण फार जास्त आहे. विशेष म्हणजे ‘पीएम २.५’च्या प्रमाणात नागपूरचा राज्यात तिसरा क्रमांक आहे.२०१८ साली नागपुरातील वातावरणातील ‘पीएम २.५’चे सरासरी वार्षिक प्रमाण ४६.६ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते.

राज्यात मुंबई व औरंगाबादनंतर नागपुरचा तिसराक्रमांक होता. तर देशात नागपूर ४१ व्या स्थानी होते. २०१७ मध्ये ‘पीएम २.५’चे सरासरी प्रमाण ५६.२ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ‘पीएम २.५’चे प्रमाण घटले असले तरी निर्धारित पातळीहून हा आकडा अधिकच आहे. ‘पीएम २.५’च्या वाढलेल्या प्रमाणामुळे ‘व्हिजिबिलिटी’वर परिणाम होण्याची शक्यता असते. शिवाय हे कण दूरवर वाहून जाऊ शकतात. त्यांच्या रासायनिक घटकांनुसार तलावांतील आम्लपणा वाढू शकतो. तसेच जमिनीची सुपीकतादेखील धोक्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे ‘अ‍ॅसिड रेन’चे प्रमाणदेखील वाढण्याचा धोका असतो.

आंतरराष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त पातळीहवेत असलेले अतिसूक्ष्म कण, धूळ, मातीचे कण, वायू इत्यादींचे मिश्रण होऊन ‘पीएम’ (पर्टिक्युलेट मॅटर) तयार होतात. ‘पीएम २.५’ ला जास्त धोकादायक मानण्यात येते. याचा आकार २.५ मायक्रोमीटरहूनदेखील लहान असतो. हे सूक्ष्मकण श्वासनलिकेवाटे थेट शरीरात शिरण्याचा धोका असतो. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ची निर्धारित पातळी १० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी आहे. तर भारतात ही पातळी ४० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी आहे. या पातळीहून नागपुरात हे प्रमाण फार जास्त आहे.

नागपूरमधील ‘पीएम-२.५’चे प्रमाणवर्ष प्रमाण (मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरमध्ये)२०१३          ३३२०१४          ३४२०१६          ८४२०१७         ५६.२२०१८           ४६.६

टॅग्स :World Environment DayWorld Environment Day