शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

लोकमत सुवर्ण महोत्सवी वर्ष; टेकडी गणेशाच्या चरणी ५० किलोंचा लाडू अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 11:33 IST

Nagpur News : विदर्भाच्या मातीतून जन्मलेले आणि गेली सलग ५० वर्षे निरंतर लोकजागरासाठी वाहून घेतलेले ‘लोकमत’ आज आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे.

ठळक मुद्देनिरंतर लोकजागराचा सुवर्णमहोत्सव

नागपूर : विदर्भाच्या मातीतून जन्मलेले आणि गेली सलग ५० वर्षे निरंतर लोकजागरासाठी वाहून घेतलेले ‘लोकमत’ आज १५ डिसेंबर रोजी आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. या वर्धापन दिनानिमित्त लाखो नागपूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपतीच्या चरणी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते आज सकाळी ५० किलोंचा लाडू अर्पण करण्यात आला.

१५ डिसेंबर १९७१ रोजी स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी यांनी नागपुरातून ‘लोकमत’ची मुहूर्तमेढ रोवली. यवतमाळच्या मातीतून निपजलेले हे रोपटे ५० वर्षांत वटवृक्षात रूपांतरित झाले. महाराष्ट्रभर त्याच्या पारंब्या पसरल्या. वितरणापासून तर सुबक अंक-छपाईपर्यंतचे सर्व विक्रम तोडून लोकमत ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ झाले. समाजाच्या संवेदना टिपत महाराष्ट्रव्यापी झालेला लोकमत आणि वाचकांसाठी हा आनंदाचा दिवस आहे.

विदर्भात सजणार रांगोळ्या

‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लोकमत सखी मंच आणि प्रेरणा सेवा मंडळ संचालित प्रेरणा इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने १५ डिसेंबरला बुधवारी विदर्भस्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. विदर्भातील महिला, युवती आणि सखी मंचच्या सदस्या यात सहभागी होत असून जणू विदर्भाचे अंगणच या स्पर्धेतून मनमोहक रांगोळ्यांनी सजणार आहे. ‘लोकमत सुवर्ण महोत्सव १९७१-२०२१’ असा उल्लेख करून आणि त्यावर एक पणती लावून विदर्भातील भगिनीही या निरंतर लोकजागराचा आज विदर्भामध्ये सुवर्णमहोत्सव ! आनंदोत्सवात सहभागी होत आहेत.

सर्वधर्म समभाव परिषद

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अंतर्गत सामाजिक सद्भावनेचा संदेश देत नागपुरात २५ ऑक्टोबरला ‘लोकमत राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद’ आयोजित करण्यात आली होती. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, पतंजली योगपीठाचे संस्थापक बाबा रामदेव, नवी दिल्ली येथील अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे धर्मगुरू ब्रह्मविहारी स्वामी, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल्ड ओसवाल्ड ग्रेसियस, जीवन विद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै, लेह-लडाख येथील महाबोधी आंतराष्ट्रीय तपसाधना केंद्राचे संस्थापक भिक्खू संघसेना या जागतिक पातळीवरील धर्मगुरूंनी ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर झालेल्या परिसंवादातून देशाला सामाजिक सद्भावनेचा संदेश दिला होता.

टॅग्स :LokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंटVijay Dardaविजय दर्डाRajendra Dardaराजेंद्र दर्डा