शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

चेनस्रॅचिंगचे नेटवर्क

By admin | Updated: June 12, 2014 01:20 IST

शहरात मंगळसूत्र आणि सोनसाखळ्या पळविणाऱ्या गुन्हेगारांचे मोठे नेटवर्क आहे. हे गुन्हेगार सहज हाती लागणे मुश्कील असून भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या सासू जयश्री सुरेंद्र

द्रविड यांच्या सासूचे मंगळसूत्र पळविले : गुन्हेगार गवसतील काय ?नागपूर : शहरात मंगळसूत्र आणि सोनसाखळ्या पळविणाऱ्या गुन्हेगारांचे मोठे नेटवर्क आहे. हे गुन्हेगार सहज हाती लागणे मुश्कील असून भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या सासू जयश्री सुरेंद्र पेंढारकर यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पळवणारे लुटारू पोलिसांना गवसतील काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुभाषनगर नाईक ले-आऊटमधील जयमंगल अपार्टमेंट येथे राहणाऱ्या जयश्री पेंढारकर या मंगळवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास व्हीआरसीई कॉलेजजवळील स्टेट बँक आॅफ इंडिया येथून काम आटोपून एटीएमजवळ पार्क केलेल्या आपल्या कारमध्ये बसत असतानाच त्यांच्या मागावर असलेल्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटका मारून पळवून नेले. या घटनेने व्हीएनआयटीच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पेंढारकर आणि प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना लुटारूंचे वर्णन सांगितले. परंतु अद्यापही आरोपी गवसलेले नाहीत. १० ते १२ टोळ्याकमी जोखीम आणि क्षणात भरपूर पैसा देणाऱ्या चेनस्रॅचिंगच्या गुन्ह्याकडे घरफोडी आणि चोरीचे गुन्हेगारही वळत असून चेनस्रॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचे नेटवर्क सतत वाढत आहे. ही माहिती या गुन्ह्याचा तब्बल चार वर्षे अभ्यास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. सध्या शहरात १० ते १२ टोळ्या असून टोळीतील एखादा गजाआड झाला की, त्याच्यासोबतचा लागलीच दुसरी टोळी तयार करतो. पोलिसांच्या अभिलेखावर आतापर्यंत या गुन्ह्यातील दीडशेवर गुन्हेगार आहेत. मुस्तेफा ऊर्फ शानूखाँ जमीलखाँ पठाण हा या धंद्यातील सर्वात मोठा गुन्हेगार आहे. त्याच्या खालोखाल शानूखाँचा भाऊ मंजू, सचिन नरहरी पेशवे, लोकेश भोंडे, स्वरूप नरेश लोखंडे, निकुंज ऊर्फ निक्की रमेश साधवाणी यांचा क्रमांक लागतो. परंतु ते सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. या गुन्ह्यातील नंबर दोनचे म्होरके मोहम्मद इस्ताक ऊर्फ बाबा आणि सतीश समुद्रे हे बाहेर असून ते वेगवेगळ्या भागात गुन्हे करीत असल्याची पोलिसांना माहिती आहे. या गुन्ह्यात बी.एससी. आणि बी.बी. ए. सारखे शिक्षण घेतलेले विद्यार्थीही सक्रिय आहेत.गतवर्षी प्रकाश पारधी आणि सुमित श्यामलाल वर्मा नावाच्या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. ते सध्या कारागृहात आहेत. हे गुन्हेगार पोलिसांची गस्त नसलेल्या भागात टेहळणी करतात आणि आपले सावज हेरतात. सोनारांनी तुटलेल्या चेन आणि मंगळसूत्र विकत घेऊ नये, पोलिसांना त्याबाबत सूचना द्यावी, ज्या भागात असे गुन्हे अधिक प्रमाणात घडतात तेथे पोलिसांची सतत गस्त असावी, त्यामुळे चेनस्रॅचिंगच्या गुन्ह्यांवर आळा बसू शकतो, असेही या पोलीस अधिकाऱ्याचे मत आहे. (प्रतिनिधी)