शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मराठीला अभिजात दर्जा देण्यास केंद्राची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 20:43 IST

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्या प्रकरणी केंद्र सरकार निव्वळ टाळाटाळ आणि वेळकाढूपणा करीत आहे. आता भाषा तज्ज्ञांच्या समितीला नव्याने अहवाल देण्याचे आदेश केंद्राने दिले असल्याचे पुढे असल्याने तर याची खात्रीच पटली असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पूर्वाध्यक्ष डॉ श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री व मराठी भाषा मंत्री यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाने रोखठोक भूमिका घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्या प्रकरणी केंद्र सरकार निव्वळ टाळाटाळ आणि वेळकाढूपणा करीत आहे. आता भाषा तज्ज्ञांच्या समितीला नव्याने अहवाल देण्याचे आदेश केंद्राने दिले असल्याचे पुढे असल्याने तर याची खात्रीच पटली असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पूर्वाध्यक्ष डॉ श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री व मराठी भाषा मंत्री यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.भाषा तज्ज्ञांच्या समितीची साहित्य अकादमीच्या माध्यमातूनच बैठक होऊन त्याचे इतिवृत्त केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठवून झाल्याचे साहित्य अकादमीने माहिती अधिकारात अधिकृतरीत्या कधीच कळवून झाले आहे, त्याच्या बातम्याही येऊन गेल्या.आता पुन: नव्याने तेच करण्याची मग केंद्राला काय गरज? हे त्यांना आपण विचारायला हवे असे डॉ जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.हा केंद्राचा शुद्ध वेळकाढूपणा असून तोंडाला केवळ पाने पुसण्याचा प्रकार आहे. यापूर्वीच्या सभेने मराठीला अभिजात दर्जा देता येईल असे म्हटले अस्तन हि अडवणूक कशाला, असा प्रश्न विचारला आहे. राज्य शासनाकडे महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीनेही वेळोवेळी पाठविल्या गेलेल्या पत्रात देखील ही वस्तुस्थिती नमूद असल्यानेमहाराष्ट्र शासनाने देखील पुन: पुन्हा बैठकींचा घाट घालू नये व त्यास मान्यता देऊ नये कारण असे करणे म्हणजे आपण जिथून सुरूवात केली तिथेच पुन: परतणे होय.तसे न करता व पुन: हा बैठकींचा घाट न घालता काही रोखठोक भूमिका घ्यायला हवी आहे.त्या दृष्टीने कृपया विचार व्हावा असे डॉ श्रीपाद जोशी यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. 

 

टॅग्स :marathiमराठी