शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

केंद्रीय पथकाने नागपूर जिल्ह्यातील गावांना दिल्या भेटी; शेतकऱ्यांशी केली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 14:32 IST

Nagpur News पारशिवनी तालुक्यातील सालई- माहुली येथे पेंच नदीवरील पुलाच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय रस्ते व दळणवळण आणि महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी आज केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: पारशिवनी तालुक्यातील सालई- माहुली येथे पेंच नदीवरील पुलाच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय रस्ते व दळणवळण आणि महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी आज केली.पारशिवनी तालुक्यात ग्रामीण पायाभूत विकास निधीतून मनसर- माहुली-सालई- बिटोली येथील पेंच नदीवरील पुलाचे बांधकाम २०१८ रोजी पूर्ण करण्यात आले होते. मध्य प्रदेशातील चौराई धरणातून २९ आॅगस्ट २०२० रोजी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात पुलाचा काही भाग कोसळला आहे. पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प नागपूर मिलींद बांधवकर, सहाय्यक अभियंता सुनील दमाहे, शाखा अभियंता ए. एस. महाजन, यांच्यासह मंडळ अधिकारी मंडळ राजेश घुडे, तलाठी विश्वजीत पुरामकर पाहणी पथकामध्ये आहेत.केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचा आक्रोशगत आॅगस्ट महिन्यात कन्हान नदीला आलेल्या महापुरामुळे कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा या गावाला पुराने वेढले होते. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात जाऊन अनेकांची घरे पडली. अनेकांच्या घरातील जीवनाश्यक वस्तूचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. शेतक?्याच्या शेतातील मोठ्या प्रमाणात पिके उध्वस्त झाली. ही आपती झाल्याच्या चार महिन्यानंतर गुरुवारी केंद्रीय पथक सोनेगाव राजा (ता. कामठी) येथे आले असता स्थाई पट्टी व शासनाकडून घरे बांधण्याकरता निधी देण्याची मागणी पथकासमोर पुरग्रस्तानी केली.29 आॅगस्ट ला कन्हान नदीला आलेल्या महापुराने कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा या गावाला पुराने वेढले होते. पुराच्या पाण्याने 56 नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले तर 64 नागरिकांच्या घरे पडली होती. 225 हेक्टर जमिनीतील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाच्या वतीने पुरग्रस्ताचे नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करिता याद्या सादर करण्यात आल्या होत्या. यानंतर काही नुकसानग्रस्तांना राज्य सरकारकडू मदत सुध्दा मिळाली आहे. मात्र ती अल्प स्वरूपाची आहे.सोनेगाव राजा या गावाला 1994 मध्येसुद्धा पुराने वेढले होते. तेव्हा गावक?्यांनी गावाच्या पुनर्रवसणाची मागणी केली होती. शासनाच्या वतीने गावाशेजारी साडेपाच एकर जागा मंजूर करुन स्थाई पट्टी देण्याचे आश्वासन दिले होते. काही नागरीकांना पट्टे सुद्धा मिळाले काहीनी घरे बांधून वास्तव्य सुद्धा गेले आहेत. सोनेगाव राजा येथील 170 कुटुंबातील नागरिकांना स्थायी पट्टे न मिळाल्यामुळे ते त्याच गावात वास्तव्यास आहेत. 29 आॅगस्टला आलेल्या पुराने संपूर्ण गावाला वेढले होते. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथकाचे केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग, मुख्य अभियंता नागपूर महेंद्र सहारे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी श्याम मनुरकर, तहसीलदार अरविंद हिंगे यांचे पथक सकाळी दहा वाजता सुमारास सोनेगाव राजा येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असता जिजाबाई शंकर गजभिये ( 60) यांच्या सह 20 महिलांनी केंद्रीय पथकातील सदस्यापुढे आक्रोश व्यक्त करत मदतीची मागणी केली.शासनाच्या वतीने स्थायी पट्टे व घर बांधण्याकरिता निधी देण्याची मागणी त्यानी केली.राहुल महल्ले या शेतक?्याच्या शेतात पथक नुकसानीची पाहणी करण्याकरीता गेले असता महल्ले यांनी, हे शेत मी यांनी हे शेत मी ठेक्याने केले असून या शेतातील संपूर्ण पीक नष्ट झाले असून मला कुठल्याही प्रकारची शासनाच्यावतीने मदत मिळाली नाही असे पथकातील सदस्यांना सांगितले. मधुकर देवाजी चौधरी यांची एक गाय पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे नुकसान झाले. परंतु आज पर्यंत त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसून त्यांनी ही केंद्रीय पथकासमोर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. गावातील नामदेव दाजीबा ढोले, बंडू चौधरी यांनीही स्थायी पट्टे देण्याची मागणी केली. सोबतच काही पूरग्रस्तांना शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून नुकसानग्रस्त भागाचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी तहसीलदार यांना परत पाठवून माहिती घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी मौद्याचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे, तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत,नायब तहसीलदार रणजीत दुसावार, सोनेगाव राजाचे सरपंच चंद्रकांत हेवट यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी