शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय आरोग्य पथकाने केली कंटेनमेंट झोनची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:18 IST

Central Health Squad inspects containment zone केंद्रीय आरोग्य पथक सध्या नागपुरात आहे. शुक्रवारी या पथकाने नागपुरातील विविध झोनमध्ये प्रभावी कंटेनमेंट झोन, कोरोना चाचणी केंद्र तसेच लसीकरण केंद्रांची पाहणी केली.

ठळक मुद्देमनपा अधिकाऱ्यांना दिल्या आवश्यक सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रीय आरोग्य पथक सध्या नागपुरात आहे. शुक्रवारी या पथकाने नागपुरातील विविध झोनमध्ये प्रभावी कंटेनमेंट झोन, कोरोना चाचणी केंद्र तसेच लसीकरण केंद्रांची पाहणी केली. पथकाने कंटेनमेंट झोनमधल्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे, नागरिकांना झोनमधून बाहेर जाण्यावर प्रतिबंध लावणे तथा सर्वेक्षण करणारी टीमला बाधितांचे ऑक्सिजनचे प्रमाण तसेच टेम्परेचर तपासण्याचे निर्देश दिले. पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्येही भेट दिली तसेच नेहरूनगर व गांधीबाग झोन अंतर्गत कंटेनमेंट झोनची पाहणी केली.

केंद्रीय आरोग्य पथकामध्ये दिल्लीचे एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. हर्षल साळवे व नागपूर एम्सचे प्रो. डॉ. पी. पी. जोशी यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत नागपूर महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, नेहरूनगर झोनचे सहाय्यक आयुक्त हरीश राऊत होते.

पथकाने प्रभाग क्र.३० मधील ‍बिडीपेठ कंटेनमेंट झोन, प्रभाग २८ मध्ये सर्वश्रीनगर दिघोरी, प्रभाग २६ मध्ये सरजू टाऊन वाठोडा कंटेनमेंट क्षेत्राचा दौरा केला तसेच नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केद्र दर्शन कॉलनी येथे कोरोना चाचणी केंद्र व लसीकरण केंद्राची पाहणी केली. पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता व इंदिरा गांधी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कोविड रुग्णांची एस.ओ.पी.बद्दल माहिती घेतली.

कोरोनावर नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसोबतच कोविड प्रोटोकॉलची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावी व परिणामकारक करण्यावर विशेष भर देण्यात यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य पथकाकडून करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर