शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

सामाजिक कार्याचे केंद्र सैतवाल जैन मंदिर

By admin | Updated: May 20, 2014 00:53 IST

महावीर नगर ग्रेट नाग रोड येथील श्री सैतवाल जैन मंदिराचे स्वरूप आता भव्यदिव्य झाले आहे. मंदिराच्या प्रांगणात स्थापन करण्यात आलेला विशाल मानस्तंभ, भगवान

मंदिराच्या जीर्णोद्धाराने लाभली भव्यता

नागपूर : राघवेन्द्र तिवारी :

महावीर नगर ग्रेट नाग रोड येथील श्री सैतवाल जैन मंदिराचे स्वरूप आता भव्यदिव्य झाले आहे. मंदिराच्या प्रांगणात स्थापन करण्यात आलेला विशाल मानस्तंभ, भगवान पार्श्वनाथ यांची श्यामवर्णाची प्रतिमा आणि आचार्य आर्यनंदीजी महाराज यांची ध्यानस्त प्रतिमा भाविकांना ध्यान मार्गाकडे जाण्यासाठी प्रेरित करणारी आहे. सैतवाल जैन समाज नागपुरातील मूळ निवासी आणि सर्वाधिक संख्येत असणारा जैन समाज असल्याची मान्यता आहे. सैतवाल जैन समाजाचा नागपुरातील वास्तव्याचा इतिहास बराच जुना आहे. राजे भोसलेंच्या सेनेतील एक मुख्य अधिकारी सैतवाल समजाचाच होता. राजे भोसले यांनी त्यांची सेना मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरच्या किल्ल्यात आणि कर्नाटक येथील बेलगोला येथे पाठविली होती. यावेळी या दोन्ही स्थानावर सैतवाल समाजाच्या सेना अधिकार्‍याने त्यांचे आराध्य दैवत असलेल्या भगवान बाहुबलीची प्रतिमा स्थापन केली होती. या प्रतिमा आजही दोन्ही स्थानावर स्थापित आहेत. या प्रतिमा ज्या काळात स्थापन करण्यात आल्या, त्याचा उल्लेखही येथील शिलालेखांवर आहे. सैतवाल समाजाची मूळ भाषा मराठी आहे. सैतवाल समाजाला संघटित करणारी ही संस्था १९४१ सालापासून अस्तित्वात आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. यात प्रामुख्याने शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. संस्थेच्या सामाजिक कार्यांसाठीच मंदिराची भूमी संस्थेला १९७० साली प्राप्त झाली. १९८४ साली येथे मुलांसाठी वसतिगृह आणि लहान मंदिर तयार करण्यात आले. मंदिराच्या निमित्ताने येथे अनेक सामाजिक उपक्रमांना प्रारंभ करण्यात आला. नुकतेच समाजातील दानशूरांच्या मदतीने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराचे बांधकाम आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. हे मंदिर आता अधिक दर्शनीय आणि प्रसन्न वातावरणनिर्मिती करणारे झाले आहे. मंदिरात भगवान महावीर आणि भगवान बाहुबली यांच्या प्रतिमा लक्ष वेधून घेणार्‍या आहेत. याशिवाय मंदिरात पद्मावती आणि क्षेत्रपाल यांच्या प्रतिमा आहेत. मंदिरातील आतील भागात एक प्रवचन सभागृह आहे. सभा मंडप, होमिओपॅथी व फिजीओथेरपी रुग्णालयही मंदिराच्यावतीने चालविण्यात येत आहे. त्याची वेळ सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ६.३० ते ८ आहे. विद्यार्थ्यांसाठी दुसर्‍या माळ्यावर वसतिगृह आाहे. (प्रतिनिधी)