शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने अडविले नागपुरातील ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 21:38 IST

केनिया किंवा दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये जाणाऱ्यांना ‘येलो फिव्हरची लागण होऊ नये म्हणून नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्राला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रशिक्षणाला पाठविण्यासाठी मुंबई येथील केंद्रीय आरोग्य विभाग मंजुरीच देत नसल्याने गेल्या वर्षभरापासून हे केंद्र रखडले आहे.

ठळक मुद्देडागा रुग्णालयात होणार होते केंद्रमध्य भारतातील लोकांना गाठावे लागत आहे मुंबई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केनिया किंवा दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये जाणाऱ्यांना ‘येलो फिव्हरची लागण होऊ नये म्हणून नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्राला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. दरम्यानच्या काळात एका आरोग्य अधिकाऱ्यासह पाच जणांना प्रशिक्षण देण्यात आले. परंतु प्रशिक्षणप्राप्त करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचीच बदली करण्यात आली. तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रशिक्षणाला पाठविण्यासाठी मुंबई येथील केंद्रीय आरोग्य विभाग मंजुरीच देत नसल्याने गेल्या वर्षभरापासून हे केंद्र रखडले आहे. या लसीसाठी मध्य भारतातील लोकांना मुंबई गाठावी लागत आहे.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येक भारतीयाला आफ्रिकन देशात जाण्यापूर्वी ‘येलो फिव्हर' लस टोचली जाते. आंतरराष्ट्रीय व्हिसा नियमांतर्गत ही लस टोचून घेणे बंधनकारक आहे. सध्या आफ्रिकन देशात जाण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांना लस टोचण्यासाठी राज्यात आरोग्य विभागाची मुंबई व पुण्यातच सोय आहे. नागपुरात एका खासगी इस्पितळाला याची परवानगी दिली आहे. परंतु येथे लसीचा तुटवडा, तसेच मोठी किंमतही चुकवावी लागत असल्याने नाईलाजाने अनेकांना मुंबई जवळ करावी लागते.डागा रुग्णालयाचा पुढाकारनागपूरच्या शासकीय सेवेत हे लसीकरण केंद्र सुरू झाल्यास मध्य भारतातील नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार होता. शिवाय मुंबईच्या केंद्रात होणारी गर्दी कमी होणार होती. ही बाब लक्षात घेत आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी या संदर्भात प्रस्ताव पाठविला. त्याला मंजुरी मिळाली. डागा रुग्णालयाने यासाठी पुढाकार घेत हे केंद्र स्थापित करण्याचा निर्णयही घेतला. एक वैद्यकीय अधिकाऱ्यासह, परिचारिका, फार्मसिस्ट व चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा पाच जणांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. परंतु प्रशिक्षण प्राप्त करून येताच वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. यामुळे दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा प्रस्ताव मुंबई येथील केंद्रीय आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला. परंतु अद्यापही याला मंजुरी न मिळाल्याने हे केंद्र तूर्तास तरी कागदावरच आहे.मेडिकलनेही पाठविला होता प्रस्तावदोन वर्षांपूर्वी नागपूर मेडिकलच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाकडून येलो फिव्हर लसीकरण केंद्राचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही. विशेष म्हणजे, यासाठी अधिकृत अधिकारी म्हणून डॉ. अविनाश गावंडे व डॉ. समीर गोलावार यांची नेमणूक करण्यात आली होती.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर