शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मानकापूर क्र्र ीडा संकुलात होणार शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

By admin | Updated: August 30, 2015 02:51 IST

नागपूर महापालिकेला १५० वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने आयोजित शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या तयारीला मनपा प्रशासन लागले आहे.

प्रशासन लागले कामाला : राष्ट्रपतींच्या स्वागताची तयारीनागपूर : नागपूर महापालिकेला १५० वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने आयोजित शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या तयारीला मनपा प्रशासन लागले आहे. यशवंत स्टेडियम येथे हा समारंभ होणार असल्याची चर्चा होती. परंतु यासाठी मनकापूर क्रीडा संकुलाची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रवण मुखर्जी महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याबाबत त्यांच्या कार्यालयाकडून संमती पत्र प्राप्त होताच प्रशासन कामाला लागले आहे. महोत्सव प्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते भांडेवाडी येथील विस्तारीत मलनिस्सारण प्रकल्प व मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच मुखर्जी यांच्याहस्ते मनपाच्या इतिहासावर आधारित गौरव ग्रंथाचे लोकार्पण केले जाणार आहे. मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर व पोलीस आयुक्त एस.पी.यादव यांच्यात सुरक्षा व्यवस्थेवर नुकतीच बैठक झाली. त्यानंतर पोलीस पथकाने मानकापूर क्रीडा संकुलाची पाहणी केली. राष्ट्रपती उपस्थित राहणार असल्याने क्रीडा संकुलाला पोलीस छावणीचे स्वरूप येणार आहे. येत्या मंगळवारी महोत्सवाचा अंतिम आराखडा तयार करून विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याशी विविध विभागाचे अधिकारी चर्चा करणार आहे. कार्यक्रमाचा आराखडा निश्चित झाल्यानंतर राज्याचे मुख्य सचिवांना याची माहिती दिली जाणार आहे. त्यांच्या कार्यालयाकडून राष्ट्रपती कार्यालयाला कार्यक्रमाची विस्तृत माहिती पाठविली जाणार आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरी नंतर कार्यक्रमाला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्यानंतर प्रोटोकालनुसार कार्यक्रमाच्या पत्रिका छापल्या जाणार आहे. (प्रतिनिधी)