शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाच्या राखेपासून तयार सेनोस्फेयरची कवडीमोल भावात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 11:47 IST

विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेपासून तयार होणारे मौल्यवान सेनोस्फेयर कवडीमोल भावात विकले जात आहे.

ठळक मुद्दे२० कोटींचा माल २० लाखात विकलाऔष्णिक विद्युत केंद्रात सुरू आहे गोरखधंदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी वीज निर्मिती कंपनी महाजेनकोमध्ये सध्या गोलमाल सुरू आहे. विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेपासून तयार होणारे मौल्यवान सेनोस्फेयर कवडीमोल भावात विकले जात आहे. जवळपास २० कोटी रु. किंमत असलेले सेनोस्फेयर केवळ २० लाख रुपयात विकल्याचा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे राज्य शासनाने हा व्यवहार पाहण्यासाठी महाजेम्स नामक कंपनी तयार करून स्वत:चे अंग काढून घेतले. जबाबदार असलेल्या महाराष्ट्र स्टेट फ्लाय अ‍ॅश कौन्सिलने यावर्षी बैठकही घेतली नाही.

महाजेनकोच्या कोराडी आणि खापरखेडास्थित औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून मोठ्या प्रमाणात राख बाहेर निघते. ही राख एकत्रित करण्यासाठी वारेगाव, कोराडी व खसारा येथे डम तयार करण्यात आले आहे. शिवाय पारशिवनी तालुक्यात एक धरण प्रस्तावित आहे. येथून राख घेण्यासाठी स्थानिक पातळीवर कंत्राट काढले जाते. राख डमच्या तलावाच्या काठावर जमा होते आणि सेनोस्फेयर पाण्यावर तरंगतो. सेनोस्फेयरसाठी वेगळी निविदा काढली जात नाही. राखेच्या निविदेसह त्याचाही निपटारा केला जातो. मात्र बाजारात या सेनोस्फेयरचे मूल्य अनेक पटीने अधिक आहे. बाजारात या राखेचे मुल्य १२०० रुपये टन असून सेनोस्फेयरची किंमत ६५ हजार रुपये टन आहे.पूर्ण राज्याचा विचार केल्यास सरकारी विद्युत केंद्रातून जवळपास २० कोटी रुपये किमतीचे सेनोस्फेयर निघते. मात्र राखेच्या निविदेत ३ लाख रुपये प्रति डमनुसार ते केवळ २० लाख रुपयात खाजगी लोकांना विकले जाते.काय आहे सेनोस्फेयर?सेनोस्फेयर औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या कोळशाच्या राखेचे रूप आहे जो हलका आणि गुळगुळीत असतो. हा सिलिका व अल्युमिनाद्वारे निर्मित असून त्यात हवा भरली असते. मात्र हा अतिशय टणक असल्याने त्याचा उपयोग हलकी आणि कठीण वस्तूंच्या निर्मिती कार्यात केला जाऊ शकते. टाईल्स आणि फॅब्रिकसमध्ये त्याचा उपयोग होतो. मशीन्सचे घर्षण नियंत्रित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.कोट्यवधींचा महसूल बुडतोमहाराष्ट्र स्टेट फ्लाय अश कौन्सिलचे सदस्य सुधीर पालिवाल यांनी, सेनोस्फेयरकडे दुर्लक्ष केल्यामुळे महाजेनको आणि राज्य सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे स्वीकार केले. सेनोस्फेयरबाबत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातक देश आहे. आणि त्याचा लाभ घेतला तर वाणिज्यिक फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विजेचे दर कमी करण्यासाठी ही कमाई महत्वाची ठरेल. मात्र सरकार या दिशेने काम करीत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी