नागपूर : भाजपने घोषणा केलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामाला अद्याप गती आलेली नाही. गेल्या दीड वर्षापासून रेशीमबाग चौकात सिमेंट रोडची गाडी अडकली आहे. यासाठी मनपाने कंत्राटदाराला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे सिमेंट रोडचे काम थांबण्याला प्रशासनच जबाबदार असल्याचा कंत्राटदाराचा आरोप आहे. आरोप-प्रत्यारोपातून वाद निर्माण झाल्याने यावर तोडगा काढण्यासाठी प्रकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आले. या संदर्भात वाड्यावर बैठक झाल्याची चर्चा आहे.गडकरी यांनी सुचविलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सिमेंट रोडचा समावेश आहे. तत्कालीन महापौर अर्चना डेहनकर यांनी जगनाडे चौकात नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन केले होते. सिमेंट रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली होती. परंतु अडीच वर्षात पाच किलोमीटर रस्ता झालेला नाही. ३० कि.मी.लांबीच्या सिमेंट रस्त्यांवर १०० कोटींचा खर्च होणार आहे. कामाला विलंब झाल्याने कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर आर्बिट्रेटरची नियुक्ती करण्यात आली. सहा महिन्यांच्या सुनावणीनंतर थक ीत बिल अदा करून कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु त्यानंतरही कामाला गती मिळालेली नाही.रेशीमबाग येथे काम थांबल्याने मनपातील सत्ताधारी नागपूर शहर विकास आघाडीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. (प्रतिनिधी)सभागृहात प्रश्न निकाली काढूसिमेंट रस्त्याचे काम थांबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कामाच्या विलंबामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई कोण देणार, हा प्रश्न सभागृहात निकाली काढला जाईल. कंत्राटदाराची मनमानी खपवून घेणार नाही, असा इशारा महापौर अनिल सोले यांनी दिला.
सिमेंट रोडची गाडी अडकली
By admin | Updated: July 20, 2014 01:18 IST