महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने शुक्रवारी संविधान चाैक येथे मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांच्या नेतृत्वात मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करून महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. दलित,वंचित आणि महिला यांच्यावर धार्मिकतेच्या दंभातून, मानवावर अन्याय व अत्याचार करणाऱ्या मनुस्मृतीची बीजे समाजात दुसऱ्या पद्धतीने राेवली जात आहेत. त्याचा नायनाट करून समतेवर आधारित समाज नव निर्मितीसाठी, अशी वेळोवेळी मनुस्मृती जाळणे आवश्यक आहे, अशी भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.
रिपब्लिकन मुव्हमेंट
मनुस्मृती दहन दिनानिमित्त रिपब्लिकन मुव्हमेंटच्यावतीने संविधान चौक येथे महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. नरेश वाहणे यांच्या नेतृत्वात झालेल्या कार्यक्रमात पृथ्वी गोटे, अमन सोनटक्के, डॉ विनोद डोंगरे आदी उपस्थित हाेते.