शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बार कौन्सिल निवडणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 01:22 IST

बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक होणार असून, त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. परिसरातील अनधिकृत हालचाली रेकॉर्ड करून संबंधितावर आवश्यक कारवाई करता यावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअनधिकृत हालचाली टिपणार : मतदान कक्षात मोबाईल नेता येणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक होणार असून, त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. परिसरातील अनधिकृत हालचाली रेकॉर्ड करून संबंधितावर आवश्यक कारवाई करता यावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदात्यांना मतदान कक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडील मोबाईल निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करावा लागणार आहे.यावेळची निवडणूक विविध कारणांनी वादग्रस्त ठरत असल्यामुळे कौन्सिल प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत सावधान आहे. निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी न्यायालय कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापूर्वी विधिज्ञ संघटनांच्या सदस्यांकडे ही जबाबदारी राहात होती. परंतु, वाद टाळण्यासाठी त्यांना निवडणूक व्यवस्थेपासून लांब ठेवण्यात आले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र व गोवा येथील तब्बल १६४ उमेदवार रिंगणात असून त्यात नागपुरातील अ‍ॅड. किशोर लांबट, अ‍ॅड. अनिल गोवारदीपे, अ‍ॅड. आसिफ कुरैशी, अ‍ॅड. विकास सिरपूरकर, अ‍ॅड. ईश्वर चर्लेवार, अ‍ॅड. सुदीप जयस्वाल, अ‍ॅड. सुनील लाचरवार, अ‍ॅड. परिजात पांडे व अ‍ॅड. अनुपकुमार परिहार या नऊ उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीत महाराष्ट्र व गोवातील नोंदणीकृत वकिलांना मतदान करता येणार आहे. नागपुरात ५,७०० नोंदणीकृत वकील असून त्यापैकी ४,९०० वकील जिल्हा विधिज्ञ संघटना तर, ८०० वकील उच्च न्यायालय विधिज्ञ संघटनेचे सदस्य आहेत. उमेदवारांनी मंगळवारी जोरदार प्रचार केला. प्रचाराचा अंतिम दिवस असल्यामुळे कुणीही वेळ व्यर्थ घालवला नाही. कौन्सिलच्या गेल्या सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी-२०१५ मध्येच संपला. परंतु, विविध कारणे व राजकीय डावपेचांमुळे ही निवडणूक आतापर्यंत लांबली.जिल्ह्यात सात न्यायालयांमध्ये मतदान केंद्रेजिल्ह्यामध्ये नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, कामठी दिवाणी न्यायालय, काटोल दिवाणी न्यायालय, रामटेक दिवाणी न्यायालय, सावनेर दिवाणी न्यायालय व उमरेड दिवाणी न्यायालय या सात ठिकाणी मतदान केंद्रे राहणार आहेत.तक्रारी निराकरणासाठी समिती स्थापननिवडणुकीशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी निरीक्षण समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात अ‍ॅड. श्यामसुंदर दांगट (9820976350), अ‍ॅड. सचिन देशमुख (9822610504), प्रवीण रणपिसे (9833695302) व अ‍ॅड. पंकज वेर्णेकर (9765629676) यांचा समावेश आहे.कुणाचीही गय केली जाणार नाहीनिवडणुकीमध्ये अनधिकृत कृती करणारा कुणीही असो, त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा निरीक्षण समितीचे सदस्य अ‍ॅड. श्यामसुंदर दांगट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. निवडणुकीशी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारींची वेळीच योग्य दखल घेतल्या जाईल, अशी ग्वाहीदेखील दांगट यांनी दिली.मतदानाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंतमतदानाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे. एका मतदाराने किमान पाच उमेदवारांना एकाच पद्धतीने व सलग पसंतीक्रमाने मतदान करणे आवश्यक आहे. यात चूक झाल्यास मतपत्रिका अवैध ठरविली जाईल.मतपत्रिकेचे छायाचित्र काढणे अशक्यकाही उमेदवार मतदार वकिलांना, त्यांनी आपल्यालाच मतदान केले हे जाणून घेण्यासाठी, मोबाईलने मतपत्रिकेचे छायाचित्र काढण्यास सांगत असल्याची चर्चा विधी वर्तुळात पसरली आहे. परंतु, कौन्सिलने मतदान कक्षात मोबाईल नेण्यास मनाई केली असल्यामुळे मतपत्रिकेचे छायाचित्र कसे काढले जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :advocateवकिलElectionनिवडणूक