शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे नागपुरात चोरट्या तरुणीचे घुमजाव; दुकानदाराची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 13:10 IST

ती आली.. तिने इकडे तिकडे पाहिले.. चोरी केली आणि निघता निघता तिची नजर सीसीटीव्ही कॅमेºयाकडे गेली.. परत फिरून तिने तात्काळ चोरीचा माल परत दुकानात ठेवला आणि सुंबाल्या ठोकल्या.

ठळक मुद्देघेतलेले लेग्निस परत ठेवले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ती आली.. तिने इकडे तिकडे पाहिले.. चोरी केली आणि निघता निघता तिची नजर सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे गेली.. परत फिरून तिने तात्काळ चोरीचा माल परत दुकानात ठेवला आणि सुंबाल्या ठोकल्या. मात्र तिचे नशीब खराब होते. लगतच्या दुसऱ्या दुकानात चोरी करताना ती रंगेहात पकडली गेली आणि तिला दुकानादारांच्या रोषाला सामोरे जावे लागले.एखाद्या चित्रपटात घडावी असा किस्सा नागपुरात बुधवारी संध्याकाळी जरीपटका या मोठ्या मार्केटमध्ये घडला. संध्याकाळी बाजार गर्दीने ओसंडून वाहत असताना, एक तरुणी कपड्यांच्या दुकानात शिरली. सोबत आणलेल्या पिशवीत तिने काऊंटरवरची एक लेगिन्स टाकली आणि ती परत फिरली. मात्र नकळत तिची नजर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर गेली आणि तिचे धाबे दणाणले. गेल्या पावली दुकानात परत येऊन तिने पिशवीतली लेगिन्स शिताफीने परत काऊंटरवर जशीच्या तशी ठेवून दिली. तिची ही हातचलाखी या दुकानात तर खपून गेली. पण शेजारच्या दुकानात जाऊन तिने पुन्हा चोरी केली. तो क्षण मात्र तेथील दुकानदाराने हेरला आणि तिला पकडून मारहाण केली.तोंड दाखव तुझं असं म्हणत केली मारहाणदुकानदाराने पकडताच या तरुणीने आपला चेहरा केसांनी झाकून घेतला. मात्र दुकानातील अन्य पुरुष कर्मचाऱ्यांनी तिचे दोन्ही हात पकडून तिच्या चेहऱ्यावरील केस बाजूला सारत तिचे मोबाईलवर चित्रीकरण केले. एवढेच नव्हे तर या चित्रफितीत हे कर्मचारी तिला मारहाण करतानाही दिसत आहेत. मात्र या प्रकरणाची दुकानदार आणि ती तरुणी या दोघांनीही पोलिसांत तक्रार नोंदवलेली नव्हती.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी