शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिलीपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 20:22 IST

महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक सोसायटी नाशिक अंतर्गत सुरू असलेल्या एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देआदिवासी विद्यार्थ्यांचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण अधिक सोपे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक सोसायटी नाशिक अंतर्गत सुरू असलेल्या एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे. २०१९-२० या वर्षात २५ एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिलीपासून वर्ग सुरूकरण्यात येणार असल्याने प्रत्येक वर्षी दोन हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात प्रवेश देणे शक्य होणार आहे.अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर एकलव्य निवासी शाळा सुरू केल्या. २००१ ते २०१९ पर्यंत २५ एकलव्य निवासी शाळा सुरूअसून इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) या अभ्यासक्रमाचे इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण देण्यात येते. यात विद्यार्थ्यांना भोजन, निवास व्यवस्था, वह्या पुस्तके, गणवेश, लेखन साहित्य शासनामार्फत मोफत पुरवण्यात येते. नाशिक, नागपूर, अमरावती, पालघर, गडचिरोली, नंदुरबार, गोंदिया, धुळे, नांदेड, ठाणे, चंद्रपूर, यवतमाळ, अहमदनगर या ठिकाणी एकलव्य निवासी शाळा सुरू आहेत. इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा कल असलेले अनेक विद्यार्थी इयत्ता सहावीपासून एकलव्य निवासी शाळेत प्रवेश घेतात. मात्र पहिलीपासून मराठी माध्यमात शिक्षण झाल्यावर या विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी शाळेत सीबीएसई अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश देत असल्याने त्यांना भाषेची अडचण येते. आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा आणि या विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची अडचण दूर व्हावी या उद्देशाने एकलव्य निवासी शाळेत पहिलीपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे. इयत्ता पहिलीपासून उत्तम दर्जाचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याने अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणे अधिक सोपे होणार आहे. विदर्भातील एकलव्य शाळाचिखलदरा, जि. अमरावतीखैरी परसोडा, ता. रामटेक, जि. नागपूरबोरगाव, ता. देवरी, जि. गोंदियातुमरगुंडा(अहेरी), जि. गडचिरोलीदेवाडा, ता. राजुरा, जि. चंद्रपूरचामोर्शी, जि. गडचिरोलीपांढरकवडा, जि. यवतमाळगेवर्धा, कुरखेडा, जि. गडचिरोली

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी