शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नीरीत सीबीआयची धाड, माजी संचालकांच्या गैरकारभाराची चौकशी

By योगेश पांडे | Updated: July 10, 2024 15:27 IST

Nagpur : नीरीचे माजी संचालक डॉ. राकेश कुमार यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीआयच्या पथकाने बुधवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) परिसरात धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे. नीरीचे माजी संचालक डॉ.राकेश कुमार यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी सीबीआयचे पथक करत असून त्याच्याशी निगडीत काही महत्त्वाची कागदपत्रेदेखील जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सीबीआयच्या पथकाने बुधवारी सकाळी नीरीत धाड टाकली. त्यांनी विविध कार्यालयांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू केली. आश्चर्याची बाब म्हणजे नीरीतील अनेकांना या प्रकाराची माहितीच नव्हती. दुपारी लंच टाईममध्ये अनेकांना धाड टाकण्यात आली असल्याचे कळाले. नीरीचे माजी संचालक डॉ.राकेश कुमार यांच्या गैरकारभारबाबत सीबीआयकडे तक्रारी पोहोचल्या होत्या. राकेश कुमार यांच्या कार्यकाळात अशा अनेक केवळ आराखडा बनविण्यात आलेल्या संशोधनांवर पैसे दिल्याचा आरोप करण्यात आला होता. पैसे घेतल्यावर केवळ कागदपत्रे तयार करण्यात आली होती.  

विभागात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला, त्यातील खर्चावरही आक्षेप घेण्यात आले होते. रिसर्चच्या नावाखाली त्यांनी केलेला सावळागोंधळ, बनावट कंपन्यांच्या नावाने उचललेले कोट्यवधींचे अनुदान इत्यादी आरोपदेखील त्यांच्यावर होते. त्यांना सीएसआयआरने निलंबित केले होते. त्याअगोदर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली होती. या धाडीबाबत सीबीआयच्या अधिकाऱ्यांना कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. नीरीच्या दोन वैज्ञानिकांच्या घरीदेखील धाड पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर