शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

सडकी सुपारी आयातीचा तपास सीबीआयच करेल : हायकोर्टाचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 21:40 IST

CBI to probe inferior betel nut imports सडकी सुपारी आयात प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे हस्तांतरित करण्याचा आदेश मागे घेण्यासाठी डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या वतीने दाखल करण्यात आलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयच करेल, हे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देडायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यूचा अर्ज खारीज

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सडकी सुपारी आयात प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे हस्तांतरित करण्याचा आदेश मागे घेण्यासाठी डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या वतीने दाखल करण्यात आलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयच करेल, हे स्पष्ट झाले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी हा निर्णय दिला.

न्यायालयाने १० ऑक्टोबर २०१८ रोजी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा आदेश दिला होता. हा आदेश डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सवर अन्याय करणारा असल्याचे संबंधित अर्जात नमूद करण्यात आले होते. सीमाशुल्क चोरीसंदर्भातील प्रकरणाचा तपास डीआरआय करते. सीमाशुल्क टाळून सुपारी आयात करण्याची चार प्रकरणे डीआरआय नागपूरने उघडकीस आणली आहेत. त्याअंतर्गत मुंबईतील एस.ए. इन्टरप्रायजेसची १०६.११ मेट्रिक टन, सिल्व्हर एक्सपोर्टचे ८ कंटेनर, एका अज्ञात व्यापाऱ्याची १०९.२७३ मेट्रिक टन तर, नागपूर येथील मो. रझा अब्दुल गनी तवर यांची ८१.४२ मेट्रिक टन सुपारी जप्त करण्यात आली आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार ही सुपारी गुणवत्तेचे निकष पूर्ण करीत नाही. परिणामी, या प्रकरणात आरोपींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रकरणांचा तपास अंतिम टप्प्यात आहे. करिता, तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, अशी विनंती डीआरआयने केली होती. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता डीआरआयला दिलासा देण्यास नकार दिला.

जनहित याचिका प्रलंबित

यासंदर्भात सी. के. इन्स्टिट्यूट अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. मेहबूब चिमठाणवाला यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. भारतात सडकी सुपारी आयात केली जाते. ती सुपारी रोड व अन्य मार्गाने भारतात आणली जाते. अशी सुपारी बाजारात सर्रास विकली जात असल्यामुळे कर्करोग व अन्य गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे. याशिवाय छुप्या पद्धतीने सुपारी आयात केली जात असल्यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी न्यायालय मित्र म्हणून तर, याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. रसपालसिंग रेणू यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग