शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘एफडीसीएम’मधील घोटाळ्याची सीबीआय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:43 IST

बुलडाणा जिल्ह्यात महाराष्ट्र वनविकास महामंडळ म्हणजेच ‘एफडीसीएम’ने केलेल्या कामांमधील १३४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ‘एफडीसीएम’चे अधिकारी, सनदी लेखापाल व याचिकाकर्ता यांची भूमिका संशयास्पद असल्याने ‘सीबीआय’ने याची सखोल चौकशी करावी, असे निर्देश खंडपीठातर्फे देण्यात आले.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचे निर्देश : अधिकारी, सनदी लेखापाल व याचिकाकर्ता यांची भूमिका संशयास्पद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुलडाणा जिल्ह्यात महाराष्ट्र वनविकास महामंडळ म्हणजेच ‘एफडीसीएम’ने केलेल्या कामांमधील १३४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ‘एफडीसीएम’चे अधिकारी, सनदी लेखापाल व याचिकाकर्ता यांची भूमिका संशयास्पद असल्याने ‘सीबीआय’ने याची सखोल चौकशी करावी, असे निर्देश खंडपीठातर्फे देण्यात आले.१९९७-९८ मध्ये खामगाव वनप्रकल्पांतर्गत १९३०० हेक्टर वनजमिनीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘एफडीसीएम’तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यात जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या अनुदानापेक्षा कितीतरी अधिकचा खर्च करण्यात आला व जवळपास १३४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार वनविकास महामंडळाचा लिपिक मधुकर नारायण चोपडे यांनी केली होती.त्यांच्या तक्रारीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाला एक पत्र लिहिले. न्यायालयाने त्या पत्राची गंभीर दखल घेतली व जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर न्यायालयाने २०१५ मध्ये सनदी लेखापालाकडून व्यवहार तपासण्याचे आदेश दिले. मात्र, त्यातही ‘एफडीसीएम’च्या अधिकाºयांनी केवळ ठराविक मुद्यांवरच ‘आॅडिट’ केले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने सर्वांना स्पष्टीकरण मागितले. त्यावेळी याचिकाकर्त्यांनी ‘एफडीसीएम’ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ‘आॅडिट’ मर्यादित करण्याला परवानगी दिल्याचे सांगितले. या अगोदरच न्यायालयाने सर्व जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लाभ रोखण्याचे आदेश दिले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड.रोहित मासुरकर तर ‘एफडीसीएम’तर्फे अ‍ॅड.मोहन सुदामे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग