शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती वाहतुकीचा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : पाेलिसांनी नागपूर-भंडारा महामार्गावरील माैदानजीकच्या माथनी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये विनाराॅयल्टी रेतीची वाहतूक करणारा ट्रक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

माैदा : पाेलिसांनी नागपूर-भंडारा महामार्गावरील माैदानजीकच्या माथनी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये विनाराॅयल्टी रेतीची वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात ट्रकचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून रेती व ट्रक असा एकूण ३५ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री २.४० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

आसाराम हिरालाल गाडरे (३८, रा. भरतवाडा राेड, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. माैदा पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना भंडाऱ्याहून नागपूरच्या दिशेने रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या महामार्गावरील माथनी शिवारातील टाेलनाक्याजवळ नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात पाेलिसांनी एमएच-४०/बीजी-६४९७ क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली.

त्या ट्रकमध्ये रेती आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. ती रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच ट्रकचालकास अटक केली. शिवाय, त्याच्याकडून ट्रकसह रेती जप्त केली. या कारवाईमध्ये ३५ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ३६ हजार रुपये किमतीची नऊ ब्रास रेती असा एकूण ३५ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी पाेलीस उपनिरीक्षक नितीन आगासे, पाेलीस नायक मनिराम भुरे, पाेलीस शिपाई शिवाजी नागरे, जितेंद्र बाेरकर यांच्या पथकाने केली.