लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : पाेलिसांनी गुरांची अवैध वाहतूक करणारी कार पाठलाग करून पकडली. त्यात वाहनचालकास अटक केली असून, त्याच्याकडून एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील चाेरबाहुली शिवारात शुक्रवारी (दि. १२) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
फाजील अहमद फैयाज अहमद (३५, रा. लकडगंज, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी वाहनचालकाचे नाव आहे. देवलापार पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मध्य प्रदेशातून नागपूरच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या महामार्गावर नाकाबंदी केली आणि नागपूरच्या दिशेने वेगात जात असलेल्या एमएच-३१/एजी-७४७० क्रमांकाच्या कारच्या चालकास थांबण्याची सूचना केली. पाेलिसांना पाहताच चालकाने कारचा वेग वाढवून पळ काढला. त्यामुळे पाेलिसांनी पाठलाग करून ती कार चाेरबाहुली शिवारात अडवून झडती घेतली.
त्या कारमध्ये दाेन जनावरे काेंबली असल्याचे तसेच त्यातील एका जनावराचा मृत्यू झाल्याचे पाेेलिसांच्या निदर्शनास आले. चाैकशीअंती ती गुरांची वाहतूक असल्याचे तसेच ती जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी कारचालकास अटक केली. मृत जनावराची विल्हेवाट लावून जिवंत जनावराला देवलापार येथील गाेरक्षणमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. या कारवाईमध्ये एक लाख रुपये किमतीची कार आणि २० हजार रुपयाची दाेन जनावरे असा एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी दिली. याप्रकरणी देवलापार पाेेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, संदीप नागाेसे, संताेष बाट, गजानन जाधव यांच्या पथकाने केली.