शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जात जनगणनेचा उपयोग विकासासाठी व्हावा : संघ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 07:16 IST

समरसतेला धक्का नको : प्रचार प्रमुख 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखेर याबाबत ठोस भूमिका मांडली आहे. जातनिहाय जनगणनेतून समाजाचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. मात्र, असे करत असताना देशातील सामाजिक सद्भाव, अखंडता व सामाजिक समरसतेला धक्का लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. 

दोन दिवस अगोदर हिवाळी अधिवेशनानिमित्त रेशीम बागेत भाजप व शिवसेनेच्या आमदारांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर बोलताना विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी जातीव्यवस्था कालबाह्य आहे. जर जनगणनेमुळे विषमता व तेढ वाढत असेल तर त्याची गरज नाही. समाजात सामाजिक समरसता वाढली पाहिजे यावरच भर द्यायला हवा, असे म्हटले होते. यावरून काही राजकीय पक्षांनी संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे अशी भूमिका मांडली होती. देशातील काही राज्यांत यावरून विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत असताना अखेर आंबेकर यांनी संघाची अधिकृत भूमिका मांडली. 

दुबळ्या घटकांचे  व्हावे सशक्तीकरण nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारचा भेदभाव व विषमतापासून मुक्त तसेच समरसता व सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाजाला डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे.nविविध ऐतिहासिक कारणांमुळे समाजातील अनेक घटक आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिले. त्यांचा विकास आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने विविध शासनाकडून वेळोवेळी अनेक योजना राबविण्यात येत आहेत व संघाचे या पुढाकाराला समर्थन आहे. nमागील काही काळापासून जातनिहाय जनगणनेची चर्चा परत सुरू झाली आहे. मात्र याचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झाला पाहिजे, असे संघाचे स्पष्ट मत असल्याची भूमिका आंबेकर यांनी मांडली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ