शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सिटी सर्व्हेतील लाचखोर महिला जेरबंद

By admin | Updated: May 29, 2014 03:29 IST

साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना सिटी सर्व्हे कार्यालयातील परिरक्षण भूमापक

नागपूर : साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना सिटी सर्व्हे कार्यालयातील परिरक्षण भूमापक मीना फुलचंद रामटेके ऊर्फ मीना राजेंद्र गंधे हिला रंगेहात पकडण्यात आले. आठ दिवसांपूर्वी दोन हजारांची लाच घेताना सुषमा भगत हिला एसीबीच्या पथकाने पकडले होते. एकाच कार्यालयात एकाच पदावरील दोन महिलांना आठ दिवसात लाच घेताना एसीबीने पकडल्याचा हा पहिलाच प्रकार ठरला असून, यामुळे या कार्यालयात भ्रष्टाचार कसा फोफावला आहे, त्याची प्रचिती येते.

वाहतूक व्यावसायिक गजानन जगन्नाथ लोहे (वय ४२) हे प्रेमनगरातील चित्रशाळा मंदिराजवळच्या श्रीराम सोसायटीत राहातात. वडिलोपार्जित घराचे नामांतरण कुटूंबीयांचे नावावर करण्याकरीता त्यांनी नगर भूमापन कार्यालयात २९ एप्रिलला अर्ज केला होता. तो पुढच्या कारवाईसाठी परिरक्षण भूमापक मीना रामटेके गंधे यांच्याकडे होता. मीनाने हे काम करून देण्यासाठी ३,५00 रुपयांची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय काम करून मिळणार नाही, याची खात्री पटल्यामुळे आणि लाच द्यायची तयारी नसल्यामुळे लोहे यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवली. शहानिशा केल्यानंतर एसीबीचे उपायुक्त वसंत शिरभाते, अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे आज दुपारी लाचेची रक्कम घेऊन लोहे मीनाकडे गेले. तिने ही रक्कमओमप्रकाश पुनाजी बालपांडे याच्याकडे द्यायला सांगितली. बालपांडेने ही रक्कम स्वीकारताच बाजूलाच दबा धरून बसलेले एसीबीचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर, पोलीस निरीक्षक राजू बहादूरे, हवलदार दिलीप जाधव, धर्मेंंद्र काळे, शिपाई चंद्रनाग ताकसांडे यांनी बालपांडे आणि मीनाला जेरबंद केले. या दोघांवरही सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)