लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे युवक कल्याण आणि क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या सासुरवाडीत शनिवारी रात्री चोरी झाली. केदार यांच्या पत्नी अनुजा केदार काल रात्री नागपूरातील लॉ कॉलेज चौकात असलेल्या त्यांच्या माहेरी आल्या होत्या. तेथे काम करणारी मोलकरीण गीता इंगोले हिने सौ केदार यांच्या पर्समधून 3 हजार रुपये काढले आणि इतर ठिकाणी लपवून ठेवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सौ केदार यांनी पोलिसांना सूचना दिल्या. त्यानंतर अंबाझरी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली, गीताला ताब्यात घेऊन रक्कम जप्त करण्यात आली.
सुनील केदार यांच्या पत्नीच्या पर्समधून पैसे उडवले; आरोपी सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 13:46 IST