शासकीय न्यायसहाय्य विज्ञान संस्थेच्या आवारात एक्स्पो २०१७ चे उद्घाटननागपूर : ‘अटॅकर’कडून एटीएम मशिनीला कार्ड स्कीमर लावून एटीएम कार्डधारकांच्या खात्यातून लाखोंची कॅश क्षणात उडवली जाते. कॅशलेसच्या काळात प्रचंड मानसिक धक्का देणारा हा प्रकार शासकीय न्यायसहाय्य विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या एका स्टॉलवर सचित्र वर्णन करून सांगितला. टेहाळणी आणि फुलांचा वर्षाव करणारे ड्रोण लोकांचे आकर्षण ठरले होते. शासकीय न्यायसहाय्य विज्ञान संस्था आणि नागपूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय यांनी क्लाऊड फॉरेन्सिक टेक्नॉलॉजीसच्या सहकार्याने शासकीय न्यायसहाय्य विज्ञान संस्थेच्या क्रीडांगणावर दोन दिवसीय एक्सो २०१७ चे आयोजन केलेले आहे. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंग पाटणकर आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट सुनंदा ढेंगे यांच्या हस्ते एक्सोचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, संस्थेचे संचालक डॉ. जे. एम. खोब्रागडे, समन्वयक डॉ. आर. आर. पाटील, भाग्यश्री कुळकर्णी, नीती कपूर, हसी बन्सल आणि अंजली नाईक उपस्थित होत्या. एक्स्पोमध्ये २० स्टॉल असून त्यापैकी अर्धे फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक केमिस्ट्री, फॉरेन्सिक फिजिक्स, फॉरेन्सिक बायोलॉजी, फॉरेन्सिक सायकॉलॉजी, डिजिटल आणि सायबर फॉरेन्सिकचे होते. क्लाऊड फॉरेन्सिक टेक्नॉलॉजीसच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये सुरक्षाविषयक उपकरणे आणि नागपूर शहर पोलिसांच्या स्टॉलमध्ये ओळख म्हणून विविध मादक पदार्थ ठेवण्यात आले होते. पोलिसांचे भरोसा स्टॉलही होते. राष्ट्रीय अग्निशामन सेवा महाविद्यालयाने अत्याधुनिक यंत्रांचे प्रदर्शन केले होते. राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इन्टेलेक्चिवल प्रॉपर्टी मॅनेजमेंटच्या वतीने प्रशिक्षण संदर्भातील स्टॉल उभारला होता.(प्रतिनिधी) असे आहे स्कीमरएटीएम मशीनला जाड कार्ड स्लॉट आढळून आल्यास हमखास या मशीनला अटॅकरने स्कीमर लावलेला आहे, असे समजावे. अटॅकर हे स्कीमरच्या साह्याने एटीएम कार्डधारकांचा संपूर्ण गुप्त तपशील जाणून घेऊन मूळ एटीएम कार्डचे क्लोन तयार करतात आणि बेमालूमपणे एटीएमधारकांच्या खात्यातून लाखोची रक्क्म काढून घेतात. एटीएम मशीनचे पीन पॅड खिळखिळे वाटल्यास अटॅकर सक्रिय आहे, असे समजावे. चोरून नेणारी वाहनेही होतात बंदक्लाऊड फॉरेन्सिक टेक्नॉलॉजीसच्या स्टॉलमध्ये वाहनचोरीला किंवा वाहन चाचेगिरीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपकरणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. एखादा वाहनचोर एखाद्याची बाईक पळवून नेत असेल आणि तो कोणत्याही भागात असेल तर चोरलेले वाहन मोबाईलद्वारे बंद पाडल्या जाऊ शकते. नागपूरच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकाने थरारक प्रात्यक्षिक करून दाखवले. चार मुलींनी उभारले डास पळवणारे यंत्रसामान्य कुटुंबातील श्रुती पिंपळापुरे, राधा आमटे, तनिष्का कावडकर आणि श्रुती करंदीकर या विद्यार्थिनीनी सौर ऊर्जा उपकरणांचा वापर करून डेंग्यूच्या डासांना पळवणारी कम्युनिटी मॉस्किटो रिपेलन्ट बँक नावाच्या यंत्राचा आविष्कार केला. या यंत्राला जिज्ञासा रिसर्च सेंटरने अत्याधुनिक स्वरूप दिले असून हे यंत्रही लोकांचे लक्ष वेधून घेत होते.
स्कीमर लावून उडवली जाते एटीएममधील कॅश
By admin | Updated: February 10, 2017 02:53 IST