शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट कौटुंबिक हिंसाचार खटल्यांतही वापरू शकते सीआरपीसीतील अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 22:39 IST

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमांतर्गतच्या खटल्यांतही उच्च न्यायालय फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ मधील अमर्याद अधिकारांचा वापर करू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी देण्यात आला.

ठळक मुद्देपूर्ण न्यायपीठाचा निर्णय : न्यायाची मागणी पूर्ण करणे महत्त्वाचे असल्याचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमांतर्गतच्या खटल्यांतही उच्च न्यायालय फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ मधील अमर्याद अधिकारांचा वापर करू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी देण्यात आला.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पूर्ण न्यायपीठाने हा निर्णय दिला. न्यायपीठात न्या. भूषण धर्माधिकारी, न्या. सुनील शुक्रे व न्या. स्वप्ना जोशी यांचा समावेश होता. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमांतर्गतचे खटले फौजदारी स्वरुपाचे असतात काय व या खटल्यांमध्ये उच्च न्यायालय सीआरपीसी कलम ४८२ मधील अमर्याद अधिकारांचा वापर करू शकते काय या दोन प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हे पूर्ण न्यायपीठ स्थापन करण्यात आले होते. या न्यायपीठाने गेल्या २२ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय गुरुवारी जाहीर केला. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमांतर्गतचे खटले प्रामुख्याने दिवाणी स्वरुपाचे असतात. परंतु, कलम ३१ अंतर्गत देण्यात आलेल्या संरक्षणात्मक आदेशाचे उल्लंघन होणे आणि संरक्षण अधिकाऱ्याने कलम ३३ अनुसार कर्तव्य बजावण्यात कोणत्याही ठोस कारणाशिवाय कसूर करणे याच्याशी संबंधित खटले फौजदारी स्वरुपात मोडतात, असे उच्च न्यायालयाने पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. तसेच, दुसºया प्रश्नाच्या उत्तरामध्ये उच्च न्यायालय या अधिमांतर्गतच्या खटल्यांत सीआरपीसी कलम ४८२ मधील अमर्याद अधिकारांचा वापर करू शकते असे स्पष्ट केले. न्यायाची मागणी पूर्ण करणे व न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग थांबविणे हे या अधिकारांचे अंतिम लक्ष्य असल्याचे मत पूर्ण न्यायपीठाने हा निर्णय देताना व्यक्त केले.का स्थापन झाले पूर्ण न्यायपीठ‘नंदकिशोर व्यवहारे वि. मंगला बनसार’ प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाला स्वत:च्याच न्यायपीठांनी दिलेले दोन विरोधार्थी निर्णय दिसून आले. ‘मंगेश सावंत वि. मीनल भोसले’ प्रकरणामध्ये या अधिनियमांतर्गतच्या खटल्यांत उच्च न्यायालय सीआरपीसी कलम ४८२ मधील अधिकार वापरू शकत नाही असा तर, ‘नारायण थुल वि. माला वाणी’ प्रकरणामध्ये या अधिनियमांतर्गतच्या खटल्यांतही उच्च न्यायालय सीआरपीसी कलम ४८२ मधील अधिकार वापरू शकते असा निर्णय देण्यात आला होता. याशिवायही विविध प्रकरणांत विरोधार्थी भूमिका मांडण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या प्रश्नावर योग्य खुलासा होण्यासाठी पूर्ण न्यायपीठ स्थापन करण्यात आले होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयWomenमहिला