शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:07 IST

पतीपासून विभक्त झालेल्या महिलेला (वय ४२) लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आणि नंतर तिचे घर हडपून तिलाच धमकी देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध अखेर हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून पीडित महिला गेल्या चार वर्षांपासून पोलीस अधिकारी, सामाजिक संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडे पायपीट करीत होती.

ठळक मुद्देचार वर्षांपूर्वी तक्रार : महिलेच्या संघर्षाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पतीपासून विभक्त झालेल्या महिलेला (वय ४२) लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आणि नंतर तिचे घर हडपून तिलाच धमकी देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध अखेर हुडकेश्वर पोलिसांनीबलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून पीडित महिला गेल्या चार वर्षांपासून पोलीस अधिकारी, सामाजिक संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडे पायपीट करीत होती.राजेंद्र आनंदा मकदुम (वय ४२) असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे (एपीआय) नाव असून, ते सध्या सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी ठाण्यात नियुक्त आहेत.२०११ मध्ये एपीआय मकदुुम नागपुरातील इमामवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी एका नातेवाईकाने पीडित महिलेविरुद्ध तक्रार नोंदविली होती. त्याची चौकशी करण्याच्या निमित्ताने महिला आणि मकदुमची ओळख झाली. या गुन्ह्यात महिलेसोबत सहानुभूतीने वागत मकदुम तिच्या जवळ गेला. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. फेब्रुवारी २०११ मध्ये लग्नाचे आमिष दाखवून मकदुमने तिच्यासोबत शरीरसंबंध जोडले; नंतर हे दोघे पती-पत्नीसारखे वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. २०११ ते २०१४ या कालावधीत त्यांच्यातील या संबंधाने महिलेला गर्भधारणा झाली. यावेळी मकदुमने तिला धमकावत तिचा गर्भपात करवून घेतला. त्याच दरम्यान महिलेच्या नावावर असलेले लाखोंचे घरही मकदुमने आपल्या नावावर करून घेतले; नंतर मात्र लग्नास नकार देऊन तिला वाऱ्यावर सोडले. मकदुमच्या या विश्वासघाताची तक्रार २०१४ मध्ये महिलेने हुडकेश्वर ठाण्यात केली. मात्र, प्रकरण सहायक पोलीस निरीक्षकाच्याविरोधातील असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे टाळले.कायद्याचा असाही गैरवापरशरीरसंबंध जोडून महिलेला वाऱ्यावर सोडणाऱ्या मकदुमने तिचे हक्काचे छतही हिरावून घेतले अन् कायद्याचा गैरवापरही केला. आपल्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी महिला धडपड करीत असल्याचे कळताच, मकदुमने त्याच महिलेविरुद्ध ती ब्लॅकमेल करीत असल्याची तक्रार नोंदविली आणि तिलाच गुन्ह्यात गोवले. तेव्हापासून पीडित महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे पायपीट करीत आहे. अखेर चार वर्षानंतरच्या तिच्या संघर्षाला यश मिळाले आणि हुडकेश्वर ठाण्यात एपीआय सावंत यांनी सोमवारी मकदुमविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी वाडीतील पोलीस अधिकाऱ्याविरुद्धही बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

 

 

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिस