शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर  एमआयडीसीत एकतर्फी प्रेमातून आरोपीचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 23:15 IST

एकतर्फी प्रेमातून एका आरोपीने एमआयडीसीतील एका महिलेच्या (वय ४३) घरात शिरून हैदोस घातला. घरातील भांडी आणि साहित्य फेकून महिलेला आणि तिच्या मुलीला (वय १९) अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देमायलेकींना अश्लील शिवीगाळ प्रतापनगरात युवकाचे अपहरणचाकूच्या धाकावर मारहाणआरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकतर्फी प्रेमातून एका आरोपीने एमआयडीसीतील एका महिलेच्या (वय ४३) घरात शिरून हैदोस घातला. घरातील भांडी आणि साहित्य फेकून महिलेला आणि तिच्या मुलीला (वय १९) अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. त्याच्या अर्धा तासानंतर याच आरोपीने प्रतापनगरात चाकूच्या धाकावर एका युवकाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. हिमांशू चंद्राकर (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. तो गजानन नगरात राहतो.हिमांशूचे एका युवतीवर एकतर्फी प्रेम आहे. तो तिला जबरदस्तीने फोन करतो, तिचा पाठलाग करून वेळोवेळी तिला शिवीगाळ करून तिचा विनयभंग करतो. बदनामीच्या धाकामुळे युवती गप्प बसली आहे. त्यामुळे आरोपी निर्ढावला. त्याने शुक्रवारी रात्री युवतीच्या घरात शिरून हैदोस घातला. मायलेकींना चाकूचा धाक दाखवून अश्लील शिवीगाळ केली आणि धमकी देत घरातील साहित्याची फेकाफेक केली. तेथून पळ काढल्यानंतर आरोपी प्रतापनगरात आला.रात्री ७.३० च्या सुमारास चेतन मोहनराव नागपूरकर (वय १७, रा. जयताळा) हा बँक आॅफ बडोदासमोर उभा होता. आरोपी त्याच्याजवळ आला. त्याने चेतनला त्या युवतीला बोलवून दे म्हटले. चेतनने नकार दिल्यामुळे आरोपीने चाकूचा धाक दाखवत त्याला जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवले. एका निर्माणाधीन इमारतीत नेऊन आरोपीने चेतनला मारहाण केली. तू तिला बोलवून दिले नाही तर जीवे मारेन, अशी धमकी देऊन अश्लील शिवीगाळ करीत आरोपी पळून गेला. चेतनने दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी अपहरण तसेच मारहाण करून धमकी देण्याच्या आरोपावरून हिमांशू चंद्राकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली. तर, एमआयडीसी ठाण्यात महिलेने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.---मजनूगिरीचे चढले भूतआरोपी हिमांशू चंद्राकर हा पिझ्जा डिलिव्हरीचे काम करतो. त्याच्यावर सध्या मजनूगिरीचे भूत चढले असल्यासारखा तो वागतो. त्याच्यावर मारहाणीचे अन्य दोन गुन्हे दाखल असल्याचेही पोलीस सांगतात.---

टॅग्स :Crimeगुन्हाMIDCएमआयडीसी